Sumit Nagal: स्वीडनकडून भारतीय टेनिस संघाला डेव्हिड करंडकातील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत भारताचा एकेरीतील खेळाडू सुमीत नागल दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता सुमीत नागल व अखिल भारतीय टेनिस संघटनेतील (एआयटीए) यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
सुमीत नागल याने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्षाला ४५ लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप एआयटीएकडून करण्यात आला.
यावर सुमीत नागल याने स्पष्टीकरण देताना म्हटले की, देशासाठी खेळणे हे त्याच्यासाठी नेहमीच सन्मानाची गोष्ट राहिली आहे. त्याने दुखापतीमुळे डेव्हिस करंडकात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सांगितले की दुखापतीचे मॅनेजमेंट कठीण असते.