Team India : इशान किशनसोबत केला जातो भेदभाव? टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने संघ व्यवस्थापनाला फटकारले

Ishan Kishan
Ishan Kishansakal
Updated on

Team India : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला पहिल्या तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 2 अर्धशतके ठोकले. पण यानंतर इशानला दोन सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले.

यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने किशनला विश्रांती देण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जडेजा म्हणाला की, किशनला सतत संधी दिली पाहिजे. टी-20 मालिकेतील अवघ्या 3 सामन्यांनंतर त्याला विश्रांती द्यावी लागली म्हणून किशन खरोखरच इतका थकला आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Ishan Kishan
शूटिंग रेंजमध्ये मोठा अपघात! पिस्तूल गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा फटका अन् नेमबाजाने गमावला डावा अंगठा

वर्ल्ड कपमघ्ये अफगाणिस्तान संघाचा मार्गदर्शक अजय जडेजा स्पोर्ट्स टाकशी बोलताना म्हणाला की, 'वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाची लगेचच एक मालिका होती. त्यात ईशान किशन तीन सामने खेळून बाहेर गेला. तीन सामन्यांनंतर तो इतका थकला होता का की त्याला विश्रांतीची गरज होती? वर्ल्ड कपमध्येही तो फारसे सामने खेळू शकला नाही. वर्ल्ड कपपूर्वी काही सामन्यांसाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान घेण्यास पात्र होता. किती भारतीय खेळाडूंनी द्विशतक केले आहे?

अजय जडेजा पुढे म्हणाला की, तो त्याच्या दिवशी खेळ बदलू शकतो. पण तुम्ही त्याला कधी तयार करणार? त्याला नेहमी ट्रायलवर ठेवणार आहे का? गेल्या दोन वर्षांत त्याने किती सामने खेळले आहेत? भारतीय क्रिकेटची ही समस्या आताची नाही तर खूप जुनी आहे, की आपण खेळाडूला निवडत नाही तर त्यांना बाहेर करतो.

Ishan Kishan
तीन फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार...! आफ्रिका दौरावर संपणार ३१ वर्षांचा दुष्काळ? जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्व काही

शुभमन गिलला वर्ल्ड कपमध्ये पहिले दोन सामने खेळला नव्हता, त्याला डेंग्यू झाला होता. त्यामुळे इशान किशनला वर्ल्ड कपमध्ये दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर इशानने अफगाणिस्तानविरुद्ध 47 धावा केल्या. यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.