Dinesh Karthik : 'दिनेश कार्तिकला संघात जागा नाही, त्याने माझ्या शेजारी बसावं'

Ajay Jadeja Statement About Dinesh Karthik Place In Team India and Commentary
Ajay Jadeja Statement About Dinesh Karthik Place In Team India and Commentaryesakal
Updated on

Dinesh Karthik : आशिया कपसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 जणांचा संघ आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरले. या संघात विराट कोहली, केएल राहुल यांनी पुनरागमन केले आहे. तसेच फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) देखील संघात जागा मिळाली आहे. मात्र इशान किशन आणि संजू सॅमसन यासारख्या युवा खेळाडूंना डावलण्यात आले.

Ajay Jadeja Statement About Dinesh Karthik Place In Team India and Commentary
PHOTO'S | CWG 2022 : सांगता समारंभात पंजाबी भांगड्याचा तडका

भारतीय संघनिवडीनंतर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक अजय जडेजाने केलेले वक्तव्य (Ajay Jadeja Statement) सध्या चर्चेत आहे. अजय जडेजा यांनी हे वक्तव्य दिनेश कार्तिक बाबत केले. अजय जडेजाच्या मते ज्या आक्रमकतेने भारतीय संघ क्रिकेट खेळत आहे त्यानुसार दिनेश कार्तिक भारतीय संघात बसत नाही. अजय जडेजा म्हणाला की मला दिनेश कार्तिक संघात असू नये असे वाटते. मात्र तो एक चांगला समालोचक आहे त्यामुळे मी त्याला माझ्या शेजारच्या जागेवर बसवू शकतो.

अजय जडेजाने हे वक्तव्य भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यादरम्यान केले होते. तो म्हणाला होता की 'तुम्हाला जर आक्रमक क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला एक वेगाळ्या प्रकारचा संघ निवडावा लागेल. जर विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात आहे तोपर्यंत तुम्हाला दिनेश कार्तिकची गरज आहे. तो तुमचा इन्शुरन्स आहे. मात्र तुम्ही असे करणार नसाल तर दनिश कार्तिकचे संघात काहीच काम नाही.'

Ajay Jadeja Statement About Dinesh Karthik Place In Team India and Commentary
Virat Kohli : कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात पूर्ण करणार 'शतक'

माजी क्रिकेटपटूने दिनेश कार्तिकला समालोचक होण्याचाही सल्ला दिला. अजय जडेजा म्हणाला की, 'मी त्याला संघात घेणार नाही. तो माझ्या शेजारी बसू शकतो. तो एक चांगला समालोचक आहे. मी माझ्या संघात त्याला स्थान देणार नाही.' अजय जडेजाने भारतीय टी 20 संघात मोहम्मद शमीला सामिल करण्याबाबतही बोलला. मात्र अनुभवी भुवनेश्वर कुमार बद्दल मात्र त्याने नकारात्मक भुमिका घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.