मुंबई: भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) एका पाठोपाठ एक वक्तव्ये करत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात मोठी खळबळ उडत आहे. आता त्याने बॅक स्टेड विथ बोरया कार्यक्रमादरम्यान वनडे (ODI Cricket) संघातून वगळण्यावर भाष्य केले आहे. फक्त कसोटी क्रिकेट खेळणारा अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. (Ajinkya Rahane big Statement About Suddenly Dropped from ODI Team)
अजिंक्य रहाणे बॅकस्टेज विथ बोरिया (Backstage with Boria) या कार्यक्रमादरम्यान बोलाताना म्हणाला की, 'वास्तविकता ही आहे की मी फक्त एका फॉरमॅटमध्येच खेळत आहे. गेल्या दोन तीन वर्षात रणजी किंवा इतर देशांतर्गत क्रिकेटचे सामनेच झालेले नाहीत. मला वाटते की याचाही विचार केला जावा कराण घरात बसून तुम्ही धावा करू शकत नाही.' रहाणेने दावा केल्याप्रमाणे रणजी ट्रॉफीचा शेवटचा हंगाम 2019-20 ला झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे 2020-21 चा हंगाम रद्द करण्यात आला होता. याचबरोबर आताही हंगाम ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे दोन टप्प्यात होणार आहे. आता हा हंगाम 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
रहाणे पुढे म्हणाला की, 'तुम्ही नेटमध्ये कितीही सराव करा. तुमचा आत्मविश्वास हा सामने खेळल्यानंतर, सामन्यात धावा केल्यावरच वाढतो.' रहाणेने सांगितले की 2104 ते 2017 दरम्यान मी कसोटी आणि वनडे मध्ये चांगली कामगिरी करत होतो. मात्र त्यानंतर मला फार कमी सामने खेळण्यास मिळाले.
अजिंक्यने सांगितले की, 'भारतासाठी मी वनडे क्रिकेट सातत्याने खेळत होतो. मी चांगली कामगिरी करत होतो. अचानकपणे मला वगळण्यात आले. मला त्यामध्ये पडायचे नाही. मला भूतकाळात जायचं नाही. पण मी 2014-15-16 आणि 17 मध्ये चांगलं खेळत होतो हे वास्तव आहे. कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही चांगले सुरू होते. त्यानंतर मात्र मला क्वचित सामने खेळण्याची संधी मिळायला लागली. कारण कसोटी सामन्यांमध्ये मोठा गॅप असायचा.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.