Ranji Trophy 2024 Ajinkya Rahane : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाला पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. मुंबईकडून खेळताना रहाणेने चार सामन्यांत केवळ 34 धावा केल्या आहेत. छत्तीसगडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजांना केवळ एक धाव करता आली. आता या खराब कामगिरीमुळे त्याला ट्रोल केले जात आहे.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी शेवटचा सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. यामध्ये त्याने केवळ आठ धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी त्याची सध्याची कामगिरी पाहता त्याचे टीम इंडियात पुनरागमन आता कठीण दिसत आहे.
भारतासाठी 85 कसोटी सामन्यांमध्ये 5077 धावा करणाऱ्या रहाणेने 29 जानेवारी रोजी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो रणजी ट्रॉफी 2024 साठी सराव करताना दिसत होता.
मात्र, या हंगामात आतापर्यंत त्याची बॅट अजून तरी शांत राहिली आहे. त्याने सहा डावात 0, 0, 16, 8, 9, 1 धावा केल्या. अशा परिस्थितीत युजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रहाणेने या पोस्टसोबत 'नो रेस्ट डे' असे कॅप्शन लिहिले आहे.
रहाणे सध्याच्या रणजी हंगामात संघर्ष करताना दिसत असला तरी चेतेश्वर पुजाराची बॅट तांडव घालत आहे. सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने सहा सामन्यात 648 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 243 आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत पुजाराला स्थान मिळालेले नाही. असे मानले जात आहे की जर तो आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला तर तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. पुजाराने भारतासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.