Ajinkya Rahane
Ajinkya Rahanesakal

Wi vs Ind 2nd Test: उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टांगती तलवार; रोहित 'या' मराठमोळ्या खेळाडूला देणार संधी?

Published on

IND vs WI 2nd Test Playing XI : वेस्ट इंडिजसोबतचा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया विश्रांतीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. पण कर्णधार रोहितने 20 जुलैपासून होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 वर काम करण्यास सुरुवात केली आहे.

या सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे वृत्त आहे. नवदीप सैनीचं पहिलं नाव सुरू आहे. पण असा एक खेळाडू आहे, जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम खेळ दाखवून पुन्हा एकदा बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

Ajinkya Rahane
Jasprit Bumrah : 'आय एम कमिंग होम…!' बुमराह झाला भावूक, फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट

अजिंक्य रहाणेवर टांगती तलवार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे संघात परतला. त्या सामन्यात अजिंक्य रहाणेशिवाय फलंदाजीत कोणीही चमत्कार करू शकला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेवर बीसीसीआय आणि निवड समितीचा विश्वास निर्माण झाला आणि त्याचा वेस्ट इंडिज दौऱ्यात समावेश केला. पण आता रोहित पहिल्या कसोटीनंतर अजिंक्य रहाणेच्या जागी ऋतुराज गायकवाडचा समावेश करू शकतात.

Ajinkya Rahane
Wi vs Ind: ऋतुराजची एंट्री, कोहली किंवा रहाणेला डच्चू? दूसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय

अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. डॉमिनिका कसोटीत तो केवळ 3 धावा करून बाद झाला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील रहाणे आपला फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा होती, पण तो पहिल्या डावात काही विशेष करू शकला नाही. बीसीसीआय आणि निवड समितीने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले. मात्र अजिंक्य रहाणे अपयशी ठरला.

Ajinkya Rahane
IND vs WI 2nd Test Playing XI: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार, कोणाला मिळणार डच्चू?

ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचे कर्णधारपदही ऋतुराजकडे सोपवले आहे. तो महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, त्याच्या नावावर 28 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6 शतके आणि 9 अर्धशतके आणि 1941 धावा आहे. चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यातही ऋतुराज गायकवाडचा मोठा वाटा होता. त्याने 16 सामन्यात 42 च्या सरासरीने फलंदाजी करत 590 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.