Ajinkya Rahane: टीम इंडियातुन कायमचा पत्ता कटा? लिस्टरशायर क्लबमधून खेळणार रहाणे

अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय
Ajinkya Rahane
Ajinkya Rahane
Updated on

Ajinkya Rahane : सुमार फॉर्ममुळे भारतीय क्रिकेट संघातून डावलण्यात आलेला अजिंक्य रहाणे आता आगामी मोसमात लिस्टरशायर या इंग्लंडमधील कौंटी क्लबमधून खेळताना दिसणार आहे. 34 वर्षीय खेळाडूने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मंगळवारी क्लबकडून जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझननंतर आठ काऊंटी सामने आणि एकदिवसीय चषकाच्या संपूर्ण हंगामासाठी तो या खेळणार आहे.

Ajinkya Rahane
IND vs AUS Test : दाखवायचे दात वेगळे... त्यापेक्षा सराव सामना नको

अजिंक्य यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यानंतर जून महिन्यापासून तो लिस्टरशायर क्लबसोबत जोडला जाईल. या दरम्यान तो कौंटी स्पर्धेतील आठ सामने व रॉयल लंडन करंडक (एकदिवसीय क्रिकेट) यामध्ये सहभागी होणार आहे.

या रणजी मोसमात मुंबईचे नेतृत्व करताना त्याने सात सामन्यांमध्ये 57.63 च्या सरासरीने 634 धावा आणि एक द्विशतक केले आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. रहाणेने आंतरराष्ट्रीय स्तरावर 8,000 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये कसोटीत 12 आणि एकदिवसीय सामन्यात 3 शतके आहेत. त्याने 82 कसोटींमध्ये 38.52 च्या सरासरीने 4,931 धावा आणि 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 2,962 धावा केल्या आहेत.

Ajinkya Rahane
IND vs NZ: 18 महिन्यांनंतर त्रिशतक सलामीवीराची एन्ट्री! न्यूझीलंडविरुद्धची मालिका पणाला

अजिंक्यची कौंटी क्रिकेट खेळण्याची ही दुसरी खेप आहे. याआधी त्याने २०१९मध्ये हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षी चेतेश्‍वर पुजारा, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव व नवदीप सैनी यांनी इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव घेतला होता. अजिंक्यने नव्या क्लबसोबत करार झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.