"अजिंक्य रहाणेने स्वत:लाच संघातून बाहेर हाकलावं आणि..."

रहाणेच्या दोन्ही डावात मिळून केवळ ३९ धावा | IND v NZ 1st Test
Ajinkya-Rahane-INDvsNZ
Ajinkya-Rahane-INDvsNZ
Updated on
Summary

रहाणेच्या दोन्ही डावात मिळून केवळ ३९ धावा

भारतीय संघाने टी२० मालिका जिंकल्यानंतर आता कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताला विजयाची संधी आहे. दुसऱ्या कसोटीसाठी विराट कोहली संघात परतणार आहे. त्यामुळे पहिल्या सहा खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघातून बाहेर व्हावे लागणार हे पक्के आहे. श्रेयस अय्यर आणि वृद्धिमान साहा यांच्या दमदार खेळीमुळे त्यांची जागा पक्की आहे. पण मयंक अग्रवालला चांगली कामगिरी करता आली नसल्याने त्याला संघातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याने एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

Ajinkya-Rahane-INDvsNZ
IND Vs NZ : रविचंद्रन अश्विनने तोडला हरभजन सिंगचा रेकॉर्ड

"मयंक अग्रवालला संघातून बाहेर काढण्यापेक्षा अजिंक्य रहाणेने स्वत:हून संघाबाहेर व्हायला हवं आणि त्याच्या जागी विराट कोहलीने संघात यावं. रहाणे सध्या फारशी चांगली कामगिरी करत नाहीये हे स्पष्टपणे दिसतंय. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी चमकदार होऊ शखलेला नाही. पण युवा पिढीतील खेळाडूंना संधी मिळत राहायला हवी", असं धाडसी विधान माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने केलं.

"विशेषत: भारतात जेव्हा कसोटी मालिका असेल तेव्हा युवा खेळाडूंना संधी देण्यात यायला हवी. कारण परदेशातील मालिकांमध्ये चमकण्यासाठी त्यांना आधी मायदेशातील सामन्यांच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणं अधिक गरजेचं असतं. संघात बदल करताना सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. जर मयंक अग्रवालला संघातून बाहेर काढण्याचा विचार पक्का झालाच असेल तर मग मुंबईत दुसरा कसोटी सामना रंगणार असल्याने मयंकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळायला हवी", अशी अपेक्षाही आकाश चोप्राने व्यक्त केली.

Ajinkya-Rahane-INDvsNZ
IND vs NZ 1st Test Day 4 : अजिंक्य-पुजाराचं करायचं काय?

दरम्यान, न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने पहिल्या डावात २८ चेंडूत १३ धावा तर दुसऱ्या डावात ५३ चेंडूत १७ धावा केल्या. त्या तुलनेत अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ६३ चेंडूत ३५ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात १५ चेंडूत ४ धावा काढून माघारी परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.