Team India : BCCIने 'या' दिग्गज खेळाडूला अचानक केलं उपकर्णधार, मात्र कारकीर्दीला मोठा धोका

Team-India
Team-Indiasakal
Updated on

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळल्या जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने एका खेळाडूची टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करून सर्वांनाच चकित केले.

बीसीसीआयने ज्या खेळाडूला उपकर्णधार बनवले आहे, त्याची कारकीर्दीवर टांगती तलवार आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीसीसीआयने अचानक अशा खेळाडूला उपकर्णधार बनवले ज्याची स्वतःची कारकीर्द अडचणीत आहे.

Team-India
Football: मेस्सीच्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा गोलकीपर म्हणाला, 'भारतात येण्याचं माझं स्वप्न...'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे हा खेळाडू भारतीय कसोटी संघातून कायमचा बाहेर जाऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने अचानक अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले आहे, हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे.

भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेचे स्थान धोक्यात आले आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे भारतीय कसोटी संघाबाहेर आहे. श्रेयस अय्यर टीम इंडियात परतल्यावर अजिंक्य रहाणेला बाहेर पडावे लागुल शकतो.

Team-India
Team India Coach : टीम इंडियाला मिळणार नवीन कोच, 'या' दौऱ्यापासून होणार नियुक्ती

अजिंक्य रहाणेवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरला तर त्याला भारतीय कसोटी संघातून वगळले जाऊ शकते. संघात पाचव्या क्रमांकावर असलेल्या रहाणेच्या जागी एकापेक्षा एक खेळाडू संधीची वाट पाहत बसले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची ही दोन सामन्यांची कसोटी मालिका अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Team-India
Team India : BCCI घेणार मोठा निर्णय! विराट कोहली, रोहितला देणार डच्चू?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे काही मोठी कामगिरी करू शकला नाही, तर त्याची जागा हिरावून घेतली जाऊ शकते. टीम इंडियाकडे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारखे काही युवा फलंदाज आहेत, जे कसोटी संघातून त्याचा पत्ता कट करू शकतात.

सूर्यकुमार यादव हा 360 डिग्रीचा खेळाडू असून लवकरच त्याला भारतीय कसोटी संघात पुन्हा संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवसारखा स्फोटक फलंदाज कसोटी सामन्यात पुन्हा पाचव्या क्रमांकावर खेळला तर टीम इंडियाचे नशीब बदलेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.