Rohit Sharma
Rohit Sharmaesakal

माजी क्रिकेटरनं रोहितला केलं सावध; म्हणाला...

Published on

वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेतून ( India's series against the West Indies) रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात कमबॅक करतोय. टी-20 नंतर वनडेमध्ये तो पहिल्यांदा कायमस्वरुपी नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar ) याने रोहित शर्माला सावध केले आहे. आगामी काळात रोहित शर्माला फिटनेसवर खूप मेहनत घ्यावी लागेल. हे त्याच्यासमोर एक मोठे आव्हान असेल, असे आगरकर याने म्हटले आहे. maharashtra-on-rajpath-delhi-caught-everyones-attention-ss01

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेतील तिन्ही वनडे सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad ) विना प्रेक्षक खेळवण्यात येणरा आहेत. 6 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होईल. ईडन गार्डन्सच्या मैदानात या दोन्ही संघातील टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी आगरकर म्हणाला की, 'व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये संघाची सर्व सूत्रे एकाच्या हाती असणे चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) उत्तुंग भरारी घेणं सहज शक्य होईल. माझ्या मते रोहित शर्मासमोर आतापासून वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत फिटनेसचं मोठ आव्हान असेल. विराट कोहली (Virat Kohli) आणि धोनीप्रमाणे (MS Dhoni) त्याला आपला फिटनेस राखावा लागेल, असा सल्लाही अजित आगरकरने रोहित शर्माला दिला आहे.

Rohit Sharma
Video: या चिमुकल्याचे ड्राईव्ह, पूल शॉट पाहून रोहित-विराटलाही विसराल!

विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर रोहित शर्मा टी-20 चा कर्णधार झाला. बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय घेतला. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असावा म्हणून कोहलीच्या जागी त्यांनी रोहितकडे वनडेचे नेतृत्व दिले. पण दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता. आता तो वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनं नव्या पर्वाची सुरुवात करेल.

Rohit Sharma
पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हसनैनला आयसीसीनं केलं निलंबित

वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला. शिखर धवन, ऋतूराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरसह 7 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मात्र भारतीय ताफ्यात एकही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले खेळाडू क्वारंटाईनमध्ये असून इतर खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.