Aleem Dar VIDEO : DRS पाकिस्तानच्या विरोधात गेला म्हणून अलीम दार झाले नाराज, थर्ड अंपायरशी घातला वाद

Aleem Dar Argument With Third Umpire
Aleem Dar Argument With Third Umpireesakal
Updated on

Aleem Dar Argument With Third Umpire : पाकिस्तानचे पंच अलीम दार हे जगातील सर्वोकृष्ट पंचापैकी एक म्हणून ओळखले जातात. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त अंपायरिंग करणारे पंच देखील आहेत. मात्र इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते थर्ड अंपायरच्या निर्णयावर खूष नसल्याचे दिसते.

Aleem Dar Argument With Third Umpire
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचे परतीचे सगळे दोर कापले; BCCI सूर्या, गिलबाबतही घेतयं मोठा निर्णय?

इंग्लंडच्या डावातील 19 व्या षटकात फलंदाज डकेटने अब्रार अहमदच्या चेंडूवर स्विप मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅडला लागून गेल्याने पाकिस्तानच्या संघाने अपिल केली. अलीम दार यांनी डकेटला बाद ठरवले. मात्र डकेटने DRS घेत तिसऱ्या पंचांकडे अपिल केली. यावेळी तिसऱ्या पंचांना चेंडू ग्लोजला लागल्याचे आढळून आले. याचबरोबर बॅट जमिनीला घाल्याने स्निकोमिटरमध्ये देखील हालचाल दिसली.

Aleem Dar Argument With Third Umpire
Venkatesh Prasad : व्यंकटेश प्रसादच्या गळ्यात पडणार निवडसमितीच्या अध्यक्षपदाची माळ?

यानंतर तिसऱ्या पंचांनी अलीम दार यांना आपला निर्णय बदलण्यास सांगितला. दरम्यान, अलीम दार यांनी तिसरे पंच विल्सन यांना बॅट खाली लागल्याने स्निकोमिटरमध्ये हालचाल असल्याचे सांगत पुन्हा एकदा रिप्ले पाहण्यास सांगितले. यावेळी देखील तीच परिस्थिती होती. त्यामुळे तिसऱ्या अंपायने अलीम दार यांना त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितला. दार या निर्णयावर समाधानी दिले नाहीत. त्यांनी नाईलाजाने आपला निर्णय बदलला. सध्या सोशल मीडियावर हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या बेन डकेटबाबत हा किस्सा घडला त्याने पहिल्या डावात 63 आणि दुसऱ्या डावात 79 अशा एकूण सामन्यात 142 धावा ठोकल्या ठोकल्या.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.