Abdul Razzaq VIDEO : बुमराहला बेबी बॉलर म्हणणाऱ्या रझाकची त्याच्या मुलाने केली अशी अवस्था की...

Abdul Razzaq Ali Razzaq VIDEO
Abdul Razzaq Ali Razzaq VIDEO esakal
Updated on

Abdul Razzaq Ali Razzaq VIDEO : पाकिस्तानमध्ये सध्या लेजंट स्पर्धा सुरू आहे. यात स्पर्धेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या क्रिकेट रसिकांना मुश्ताक अहमद, इंझमाम - उल - हक, शाहिद आफ्रिदी यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहता येत आहे. याच स्पर्धेत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक देखील खेळत होता. मात्र त्याच्या मुलाने अली रझाकने त्याची अशी काही अवस्था केली की तो आपल्या मुलाकडे न पाहताच तेथून निघून गेला.

Abdul Razzaq Ali Razzaq VIDEO
Babar Azam PAK vs NZ : बाबर आझमने कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मात्र...

त्याचं झालं असं की ज्या अब्दुल रझाकने जसप्रीत बुमराहला बेबी बॉलर म्हणून हिणवले होते त्याच अब्दुल रझाकल्या त्याच्याच मुलाने आऊट केले. ज्यावेळी अब्दुल रझाक अली रझाकच्या गोलंदाजीवर बाद झाला त्यावेळी तो मुलाकडे न पाहताच खाली मान घालून पॅव्हेलयनमध्ये परतला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या वडिलांना बाद केल्यानंतर अली रझाकने जोरदार सेलिब्रेशन केले. (Latest Sports News)

Abdul Razzaq Ali Razzaq VIDEO
Mohammad Rizwan: पाकिस्तानमध्ये भूकंप! शाहिद आफ्रिदी येताच उपकर्णधार रिझवान कट्ट्यावर

अली रझाक हा एक युवा उद्योनमुख खेळाडू आहे. तो सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी जीवाचे राण करत आहे. अली रझाक काश्मीर प्रीमियर लीगमध्ये मीरपूर रॉयल्सकडून खेळतो. या संघाचे कोच त्याचे वडील अब्दुल रझाक आहेत. याचबरोबर अली रझाक पाकिस्तानच्या ज्यूनियर लीगमध्ये पहावलपूर रेडर्सकडून खेळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()