Igor Stimac : भारतीय फुटबॉल फेडरेशननं कोच इगोर स्टिमॅक यांची 'या' कारणामुळं केली उचलबांगडी

Igor Stimac
Igor Stimac India Football Team Head Coachesakal
Updated on

Igor Stimac India Football Team Head Coach : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भारतीय वरिष्ठ पुरूष फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. भारताला फिफा वर्ल्डकप 2026 च्या पात्रता फेरीतील तिसऱ्या राऊंडसाठी पात्र होता आलं नाही. यानंतर एआयएफएफने हा निर्णय घेतला.

Igor Stimac
Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

भारताचा कतारविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात 2 - 1 असा पराभव झाला होता. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्ये भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. याचबरोबर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा आठवड्याभरात घेण्यात आलेला निर्णय आहे.

Igor Stimac
Euro Cup 2024 : यंदाच्या युरो कपमध्ये या 5 फुटबॉलपटूंवर असणार नजर

एआयएफएफ प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते की, 'एआयएफएफचे उपाध्यक्ष एनए हारिस यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. फिफा वर्ल्डकप 2026 च्या पात्रता फेरीत वरिष्ठ पुरूष संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर या बैठकीत एकमताने संघासाठी आता नवा हेड कोच निवडण्याची वेळ आली आहे असा निर्णय झाला.

ही बैठकीनं प्रभारी सचिव सत्यनारायण यांना बैठकीतील निर्णय हेड कोच इगोर स्टिमॅक यांना कळवण्यात यावा असं सांगितलं आहे. त्यांना कोच पदाच्या कार्यभारातून तात्काळ प्रभावाने मुक्त करण्यात आलं आहे. एआयएफएफ इगोर यांनी भारतीय फुटबॉलसाठी दिलेल्या सेवाबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.