Indian Football: स्टिमॅक यांच्या हकालपट्टीचा निर्णय फुटबॉल फेडरेशनसाठी महागात, ३.३६ कोटींची देणार भरपाई

AIFF to pay $4 million to Igor Stimac: माजी फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची मुदतीअगोदर हाकालपट्टी केल्याची मोठी किंमत अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला मोजावी लागणार आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख डॉलर द्यावे लागणार आहेत.
Igor Stimac
Igor Stimac Sakal
Updated on

Igor Stimac receives $4 million compensation from AIFF: माजी फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना मुदतीअगोदर पदावरून दूर केल्याची मोठी किंमत अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला मोजावी लागणार आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख डॉलर (सुमारे ३.३६ कोटी रुपये, कर कपातीनंतर) द्यावे लागणार आहेत.

स्टिमॅक यांच्याशी असलेला करार पूर्ण होण्यास एक वर्ष शिल्लक असण्यापूर्वी भारतीय फुटबॉल फेडरेशनने गेल्या जून महिन्यात त्यांना पदावरून दूर केले होते. फिफा विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील अपयशामुळे फेडरेशनने ही कारवाई केली होती.

Igor Stimac
भारतीय फुटबॉलला यशाच्या उंचीवर नेण्याचा ध्यास...! ISL क्लबच्या प्रशिक्षकांचा निर्धार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.