Video : डोनाल्डने तब्बल 25 वर्षांनी राहुल द्रविडची मागितली माफी, म्हणाला...

Allan Donald asked Apology from Rahul Dravid
Allan Donald asked Apology from Rahul Dravidesakal
Updated on

Allan Donald asked Apology from Rahul Dravid : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान एक अजब गोष्ट घडली. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्डने भारताचा प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविडची जाहीर माफी मागितली. विशेष म्हणजे डोनाल्डने तब्बल 25 वर्षापूर्वी केलेल्या कृतीबद्दल राहुल द्रविडची माफी मागितली.

Allan Donald asked Apology from Rahul Dravid
VIDEO : विराटने दासची जिरवली! अंगावर येणाऱ्या लिटनला सिराजने घेतले शिंगावर

सोनी नेटवर्कशी बोलताना एलन डोनाल्डने राहुल द्रविडची माफी मागितली. यावेळी राहुल द्रविड देखील उपस्थित होता. भारत 1997 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी एलन डोनाल्डने राहुल द्रविडला स्लेजिंग करताना हद्द पार केली होती. यावेळी वनडे सामन्यात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला होता. यावेळी मी द्रविडला डिवचण्याच्या नादात खूप काही बोलून गेलो होते. या घटनेबद्दल मी आता त्याची जाहीर माफी मागत आहे असेही डोनाल्ड म्हणाला.

Allan Donald asked Apology from Rahul Dravid
Shubman Gill VIDEO : जिगरबाज शुभमन! कुलदीपच्या गोलंदाजीवर घेतला भन्नाट कॅच, विराटही पडला प्रेमात

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान द्रविड अँकर एका शोमध्ये बोलत असताना डोनाल्ड व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडला गेला होता. त्यावेळी त्याने जाहीर माफी मागितली. याचबरोबर त्याला डिनरसाठी देखील आमंत्रित केले.

यावर राहुल द्रविड म्हणाला की, 'डोनाल्डला याबाबतीत माफी मागण्याची काहीच गरज नाही. हा खेळाचाच एक भाग आहे अशा गोष्टी होत राहतात. ज्यावेळी दोन सर्वोच्च संघ एकमेकांशी लढत असतात त्यावेळी असे होतच असते. राहुल द्रविडचे हे वक्तव्य त्याला का जंटलमन म्हणतात याचे उदाहरण देणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.