IPL : अहमदाबाद संघ सट्टेबाजांचा; मालकी अदानी ग्रुपकडे जाणार?

IPL : अहमदाबाद संघात लागलाय सट्टेबाजांचा पैसा?
IPL betting
IPL bettingesakal
Updated on

नवी दिल्ली : आयपीएल २०२१ संपते ना संपते तोच आयपीएल २०२२ ची जय्यत तयारी बीसीसीआयने सुरु देली आहे. आयपीएल २०२२ मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवे आयपीएल संघ स्पर्धेत सामिल होणार आहे. या दोन संघांनाही प्रत्येकी तीन खेळाडूंना निवडण्याची संधी बीसीसीआयने दिली आहे. मात्र अहमदाबादचा आयपीएल संघ खेळाडू निवडण्यापूर्वीच एका वेगळ्याच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शन पूर्वीच अहमदाबाद संघ अडचणीत सापडला आहे. अहमदाबाद संघाचे मालकी हक्क असलेल्या सीव्हीसी कॅपिटलवर एरेलिया नावाच्या एका दुसऱ्या कंपनीचाही पैसा लागला असल्याचे वृत्त आले आहे. ही एरेलिया कंपनी ही सट्टेबाजीशी निगडीत कंपनी असल्याचे बोलले जात आहे. भारतात कायद्याने सट्टेबाजीवर पूर्ण बंदी आहे.

यामुळे आयपीएलमध्ये एक सट्टेबाजीशी निगडीत असलेल्या कंपनीला कसे काय सामावून घेतले जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने एका समिती नेमली आहे. गेल्या शुक्रवारी या समितीची बैठक झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागेल.

IPL betting
IND vs NZ : भारताच्या दिवसअखेर बिनबाद 69 धावा

जर चौकशीदरम्यान सीवीसी कॅपिटल्समध्ये एरेलिया नावाच्या सट्टाबाजीशी निगडीत कंपनीचा पैसा लागला आहे असे निदर्शनास आले तर अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची बोली लावलेल्या अदानी ग्रुपला हे टेंडर दिले जाईल. अहमदाबादचा संघावर बोली लावण्यामध्ये सीवीसी कॅपिटल्स आणि अदानी ग्रुप यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. मात्र सीवीसी कॅपिटल्सने अदानी ग्रुपला मागे टाकात बोली आपल्या नावावर केली होती.

IPL betting
IPL 2022: लोकेश राहुलकडून नियमाचा भंग?

मात्र सट्टेबाज कंपनीचा पैसा लागल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सीवीसी कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांनी एरेलिया कंपनीचा पैसा आयपीएल संघासाठी वापरण्यात आलेला नाही असे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना माहीत आहे की भारतात सट्टेबाजीवर बंदी आहे. सीवीसी कॅपिटल्सचा सट्टेबाजांशी कोणताही व्यवहार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.