ऑस्ट्रेलियन बोर्डाने केली संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा! 'या' स्टार खेळाडूकडे दिली तिन्ही फॉरमॅटची धुरा

Alyssa Healy named new Australia cricket captain across all three formats
Alyssa Healy named new Australia cricket captain across all three formats
Updated on

Australia Tour Of India : भारतीय महिला संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी व्यस्त आहे. तीन टी-20 सामन्यांशिवाय दोन्ही संघ एक कसोटीही खेळणार आहेत. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

या कालावधीत दोन्ही संघांमध्ये एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवले जातील. या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. मेग लॅनिंगने गेल्या महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती, त्यामुळे निवडकर्त्यांना आता नवीन कर्णधाराची निवड करावी लागली आहे.

Alyssa Healy named new Australia cricket captain across all three formats
IND vs SA : वेळ पुन्हा बदलली! टी-20 मालिका 9.30 वाजता नाही तर 'या' वेळेपासून होणार सुरू, BCCI ने स्पष्ट केलं चित्र

ऑस्ट्रेलियाने स्टार यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीची महिला क्रिकेट संघाची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. एलिसा हिलीकडे तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, ताहलिया मॅकग्राला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लॅनिंगच्या निवृत्तीनंतर हिलीने इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध संघाची कमान सांभाळली होती. आता त्याला कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॅकग्राने दोन वेळा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्वही केले आहे.

Alyssa Healy named new Australia cricket captain across all three formats
IND vs SA T20 : पहिल्या टी-20 सामन्याआधी संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

ऑस्ट्रेलियन संघाचा भारत दौरा -

  • कसोटी सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 21-24 डिसेंबर

  • पहिली वनडे, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 28 डिसेंबर

  • दुसरी वनडे, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 30 डिसेंबर

  • तिसरी वनडे, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 2 जानेवारी

  • पहिला टी-20, डी. वाय. पाटील स्टेडियम, मुंबई, 5 जानेवारी

  • दुसरा टी-20, डी. वाय. पाटील स्टेडियम, मुंबई, 7 जानेवारी

  • तिसरा टी-20, डी. वाय. पाटील स्टेडियम, मुंबई, 9 जानेवारी

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : डार्सी ब्राउन, लॉरेन चीटल, हेदर ग्रॅहम, ऍशले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, एलिसा हिली (कर्णधार), जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम

भारतीय कसोटी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंह. , तीतस साधू , मेघना सिंग , राजेश्वरी गायकवाड , पूजा वस्त्रकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.