IND vs AUS ICC World Cup 2023 Final : गोलंदाजीचा 'भार'

आपल्या संघातील गोलंदाजांच्या कामगिरीची तोंडभरून स्तुती रोहित शर्मा करत होता.
IND vs AUS ICC World Cup 2023 Final
IND vs AUS ICC World Cup 2023 Finalesakal
Updated on
Summary

महत्वाचा अंतिम सामना सोडला, तर अगदी तशीच ताकद विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांची दिसून आली आहे.

IND vs AUS ICC World Cup 2023 Final : क्रिकेट मग त्याचा प्रकार कोणताही असो, लक्ष फलंदाजांवर असते. पण, सामने जिंकून देताना मुख्य वाटा गोलंदाजांचा (Indian Bowlers) असतो. कोणताही संघ कितीही चांगली फलंदाजी करत असला आणि धावा जमा करत असला तरी, लागोपाठ दोन बळी गेले की सगळी समीकरणे बदलतात.

दडपणाचा बोजा क्षणार्धात दुसरीकडे जातो. ही ताकद असते चांगल्या गोलंदाजाची. महत्वाचा अंतिम सामना सोडला, तर अगदी तशीच ताकद विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांची दिसून आली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याची अपेक्षा होती, समोरच्या संघांना तो मोठा धक्का होता.

IND vs AUS ICC World Cup 2023 Final
Ind vs Aus Final: हारकर जीतने वाले को... वर्ल्डकपनंतर कलाकारांचा भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा

समजूतदार शमी

आपल्या संघातील गोलंदाजांच्या कामगिरीची तोंडभरून स्तुती रोहित शर्मा करत होता. ‘‘पहिली गोलंदाजी आली, तेव्हा आपल्या गोलंदाजांची चांगल्या खेळपट्टीवर दर्जेदार फलंदाजांचा भरणा असलेल्या संघांना तीनशे धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. दुसरी गोलंदाजी आली, तेव्हा नुसती धावांची राखण केली नाही, तर सळो की पळो करून सोडणारी गोलंदाजी केली,’’ असे रोहित म्हणतो.

‘‘शमीने (Mohammed Shami) दाखवलेली समज खूप वेगळी होती. कारण सुरुवातीचे काही सामने खेळायला न मिळूनही तो नाराज नव्हता. संघाच्या यशात तो आनंद मानत होता. तसेच बुमरा (Jasprit Bumrah) आणि सिराजला छोट्या छोट्या सूचना देत होता. जेव्हा संधी मिळाली तेव्हा शमीने अशा काही लयीत मारा केला की समोरचे फलंदाज हबकले,’’ रोहितने शमीची स्तुती करताना सांगितले होते.

रवींद्र जडेजा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू होताच. दुसरा फिरकी गोलंदाज कोण या प्रश्नाला रोहितने उत्तर देताना अत्यंत विचारपूर्वक कुलदीप यादवला पसंती दिली. दुसरी बाब म्हणजे कुलदीप यादवला तो पहिल्या पसंतीचा खेळाडू असल्याचे सांगून विश्वास दिला. जडेजाने स्पर्धेत सतत चांगली गोलंदाजी केली. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणारा मारा कुलदीपने केला. अखेरच्या सामन्यात मात्र हे दोघेही निष्प्रभ ठरले.

बुमराचे सातत्य

सिराजच्या गोलंदाजीत काही काही वेळा चांगलाच विखार दिसला. खरा हक्काचा गोलंदाज होता जसप्रीत बुमरा. एखादा फलंदाज जसे चांगल्या फॉर्ममध्ये असताना सतत धावा करतो. अगदी तशीच सातत्यपूर्ण गोलंदाजी बुमराने केली. चांगल्यातल्या चांगल्या फलंदाजांनी बुमराला शिंगावर घेण्याची हिंमत केली नाही. बुमरा गोलंदाजीला आला की सावध पवित्रा घेण्यातच बहुतांश फलंदाजांनी धन्यता मानली. सर्वाधिक बळी शमीने मिळवले असले, तरी बुमराने चांगला मारा करून दडपण निर्माण केले हे विसरून चालणार नाही. खाली दिलेल्या तक्त्यावर नजर टाका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाकी गोलंदाजांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी कशी सरस कामगिरी केली आहे.

IND vs AUS ICC World Cup 2023 Final
World Cup Cricket 2023 Final : भारताचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा षटकार

संघ सामने निर्धाव षटके दिलेल्या धावा काढलेले बळी

  • भारत 10 23 1986 95

  • द. आफ्रिका 9 19 2112 81

  • न्यूझीलंड 10 17 2664 71

  • ऑस्ट्रेलिया 9 9 2664 67

भारतीय फलंदाजांची कामगिरी

नाव सामने डाव नाबाद धावा

  • विराट कोहली ११ ११ ३ ७६५

  • रोहित शर्मा ११ ११ ० ५९७

  • श्रेयस अय्यर ११ ११ ३ ५३०

  • के. एल. राहुल ११* १० ५ ४५२

  • शुभमन गिल ९* ९ १ ३५४

  • रवींद्र जडेजा ११* ५ ३ १२०

  • सूर्यकुमार यादव ७* ७ १ १०६

  • इशांत किशन २ २ ० ४७

विश्‍वकरंडक अंतिम सामन्यातील भारताची नाणेफेक

  • १९८३ नाणेफेक गमावली - सामना जिंकला

  • २००३ नाणेफेक जिंकली - सामना गमावला

  • २०११ नाणेफेक गमावली - सामना जिंकला

  • २०२३ नाणेफेक गमावली - सामना गमावला

IND vs AUS ICC World Cup 2023 Final
Ind vs Aus Final: साथ तुझी माझी.. पराभवाच्या दुःखात अनुष्का विराटच्या पाठीशी ठाम

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत भारताचे ऑस्ट्रेलियावर विजय

१९९८

चॅम्पियन्स ट्रॉफी

सचिन तेंडुलकर

(सामन्यात सर्वोत्तम)

२०००

चॅम्पियन्स ट्रॉफी

युवराज सिंग

(सामन्यात सर्वोत्तम)

२००७

ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक

युवराज सिंग

(सामन्यात सर्वोत्तम)

२०११

विश्वकरंडक

युवराज सिंग

(सामन्यात सर्वोत्तम)

आयसीसीच्या स्पर्धांतील गेल्या दहा वर्षांतील भारताचा पराभव

२०१४

ट्वेन्टी-२०

विश्वकरंडक

अंतिम सामना

२०१५

विश्वकरंडक

उपांत्य फेरी

२०१६

ट्वेन्टी-२०

विश्वकरंडक

उपांत्य फेरी

२०१७

चॅम्पियन्स ट्रॉफी

अंतिम सामना

२०१९

विश्वकरंडक

अंतिम सामना

२०२१

जागतिक कसोटी

अंतिम सामना

२०२२

ट्वेन्टी-२०

विश्वकरंडक

उपांत्य फेरी

२०२३

कसोटी

अजिंक्यपद

अंतिम सामना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.