आधी रैना, मग जडेजा अन् आता रायडू, सीएसकेत नक्की चाललंय तरी काय?

अंबाती रायडूच्या निवृत्ती नाटकानंतर गुजरातविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळ्यात आले आहे.
csk
cskesakal
Updated on

गतवर्षी आयपीएल चॅम्प ठरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर नामुष्की ओढावली आहे. यंदाच्या सीझनमध्ये हा संघ फ्लॉप ठरला आहे. आयपीएलमध्ये आज 65 वा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नईमध्ये खेळवण्यात येत आहे.

अशातच काल अंबाती रायडूच्या निवृत्ती नाटकानंतर आजच्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळण्यात आले आहे. यापूर्वी सीएकेने मिस्टर आयपीएल म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला संघातून डच्चू दिला.

त्यानंतर मागील आठवड्यात माजी कर्णधार रविंद्र जडेजाला संघातून बाहेर ठेवण्यात आहे. तर आता अंबाती रायडूला प्लेइंग इलेव्हनमधून ड्रॉ करण्यात आले आहे. सीएसकेच्या सुरु असलेल्या फुल ऑन ड्रामामुळे चाहत्यांमध्ये अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा आणि...

काल अचानक माझी ही आयपीएल अखेरची आहे असे सांगणारे ट्विट करत अंबाती रायडूने निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर काही तासांतच ते ट्विट डिलीट केले. त्यानंतर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र, सीएसकेचे सीईओने त्याच्या या निवृत्ती नाटकावर प्रतिक्रिया दिली. सध्या त्याला चांगली खेळी खेळता येत नसल्याने भावनेच्या भरातून त्याने हे ट्विट केले असावे. असे सांगत तो नेहमी सीएसके संघाबरोबरच खेळणार असल्याचे सीएसकेच्या सीईओने स्पष्ट केले.

मात्र, आजच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट जगताता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

csk
CSK चा स्टार Ambati Rayudu ने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करताच, ट्विट ...

CSK आणि जडेजा यांच्यात वाद ?

आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वाद झाल्याच्या बातमीनंतर रवींद्र जडेजाने IPL 2022 मधून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली.

चेन्नई सुपर किंग्जने जडेजाच्या बरगडीला दुखापत झाल्यामुळे बाहेर गेला आहे असे कारण सांगितले आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर रवींद्र जडेजाला अनफॉलो केले आहे. त्यानंतर दोघांमध्ये मतभेदाच्या अफवा सुरु झाल्या.

या सर्व घडामोडीनंतर, सीईओ काशी विश्वनाथन यांनी 'संघ व्यवस्थापन आणि जाडेजामध्ये कोणताच वाद नसून भविष्यात जाडेजा नक्कीच सीएसके संघातच असेल''. असे मोठे विधान केले.

csk
जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

सुरेश रैनावर अनसोल्डचा शिक्का

चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आपली 12 वर्षे देणाऱ्या सुरेश रैनावर (Suresh Raina) यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) अनसोल्डचा शिक्का बसला. सीएसकेने घरवापसी मोहिमेतून रैनाला वगळले.

त्यावेळी सीएसकेच्या सीईओने सुरेश रैनाला खरेदी केले नाही याची अपराधी भावना आमच्या मनात आहेच. रैनाचे संघात नसणे निराशाजनक आहे. तो गेल्या 12 वर्षापासून संघासोबत आहे. मात्र तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की, तो आमच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये बसत नव्हता. असे कारण स्पष्ट केले.

csk
रैनाचा झाला ‘रंक’

आता याच वाटेवर जडेजा आणि अंबाती रायडू असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे. तसेच, सीएसकेच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. संघातील वातावरण खराब सुरु आहे. असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()