लंडन : इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीला अखेर नवा मालक मिळाला. अमेरिकेचे व्यावसायिक टोड बोएली (Todd Boehly) यांनी गुंतवणूक फर्म क्लिअरलेक कॅपिटल्सच्या साधीने चेल्सीला विकत घेतले. चेल्सीला विकत घेण्यासाठी जवळापास 12 जण इच्छुक होते. मात्र बोएली यांनी 4.24 बिलियन पाऊंड (जवळपास 42 हजार कोटी रूपये) खर्चून क्लबचा मालकी हक्क मिळवला आहे.
चेल्सीचे आधीचे रशियन मालक रोमन अॅब्रामोविच (Roman Abramovich) यांचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बंदी घालण्याचा प्रक्रिया सुरू असतानाच त्यांनी क्लब विकण्यासाठी काढला होता. त्यांनी क्लब विकून मिळालेला पैसा हा युक्रेनमध्ये जखमी आणि पीडितांच्या मदतीसाठी खर्च केला जाईल अशी घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी एक चॅरिटेबल फाऊंडेशन सुरू करणार असल्याचे सांगितले.
चेल्सीवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती. तरीसुद्धा खेळाडूंना सामना खेळण्यासाठी विशेष सरकारी लायसन मिळाले होते. या लायसन्सची मुदत 31 मे पर्यंत संपणार होती. दरम्यान, संघाचे नवे मालक टोड बोएली यांनी 'आम्हाला चेल्सी फुटबॉल क्लबचे नवे संरक्षक होण्याचा सन्मान मिळाला आहे. संघाचा एक मालक म्हणून आमचे धेय्य स्पष्ट आहे. आम्हाला फॅन्सला अभिमान वाटावा अशी कामगिरी करायची आहे.' याचबरोबर बोएलीने ब्रिटीश सरकार आणि प्रीमियर लीगचे देखील आभार मानले.
मे महिन्यात बोएली - क्लिअरलेक कॅपिटल्स कंसोर्टियमला क्लब विकण्यासाठी चेल्सीने हिरवा कंदिल दाखवला. कॅलिफोर्नियाच्या एका खासगी इक्विटी फर्मने पहिल्यांदाच कोणत्यातीर खेळाचा संघ विकत घेतला आहे. तर 48 वर्षाच्या बोएली यांनी यापूर्वी सातवेळी बेसबॉल वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या एलए डोजर्स, अमेरिका महिला बास्केटबॉल संघ लॉस एजिल्स स्पार्क आणि एनबीए फ्रेंचायजी लॉस एजिल्स लेकर्स यांचे मालकी हक्क देखील मिळवले आहेत.
रशियाचे व्यावसायिक रोमन अब्रामोविच यांनी 2003 मध्ये 140 मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास 1100 कोटी रूपयांना चेल्सी क्लब विकत घेतला होता. ते संघाचे मालक असताना क्लबने दोन वेळा चॅम्पियन्स लीग, 5 वेळा एफए कप, 2 वेळा युरोपा लीग आणि 3 वेळा एएफएल कप जिंकले. याचबरोबर क्लबने सुपर कप आणि क्लब वर्ल्ड कप देखील जिंकले होते. अॅब्रामोविच यांनी त्यांच्या कार्यकाळात 13 मॅनेजर नियुक्त केले होते. ते मालक असताना संघाने ट्रान्सफरसाठी जवळपास 2000 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.