MS Dhoniला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारला अमित मिश्राने दिले सडेतोड उत्तर

MS Dhoniला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारला अमित मिश्राने दिले सडेतोड उत्तर
Updated on

MS Dhoni and Amit Mishra : पाकिस्तानी क्रीडा पत्रकार हारूनने महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करणारे ट्विट केले आणि त्याला टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्राने आता प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी टीका केल्यानंतर हारूनने ट्विटरवर लिहिले की, महेंद्रसिंग धोनीपेक्षा यासिर शाहची आशियाबाहेर अधिक शतके आहेत. अमित मिश्राला धोनीचे असे ट्विट अजिबात आवडले नाही आणि त्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC T20 विश्वचषक, ICC विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

हारूनने ट्विटरवर लिहिले की, 'जे भारतीय चाहते पाकिस्तानी फलंदाजांसाठी म्हणत आहेत की ते फक्त सपाट ट्रॅकवर फलंदाजी करू शकतात. यासिर शाहने एमएस धोनीपेक्षा आशियाबाहेर अधिक शतके नोंदवली आहेत. या ट्विटला उत्तर देताना अमित मिश्राने लिहिले की, 'तीन कर्णधार, पाकिस्तानला विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 24 वर्षे लागली, एमएस धोनीने सात वर्षांत सर्वकाही जिंकले आहे.'

MS Dhoniला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारला अमित मिश्राने दिले सडेतोड उत्तर
Rahul Dravid : BCCI कडून प्रशिक्षक राहुल द्रविड यांना नारळ ? हे तीन दिग्गज शर्यतीत

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याच वेळी पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये आयसीसी विश्वचषक जिंकला, तर 2009 मध्ये युनूस खानच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक आणि सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.