Anahat Singh Squash Championships : अवघ्या 15 वर्षाच्या अनहतने भारताला स्क्वाशमध्ये मिळवून दिलं सुवर्ण पदक

Anahat Singh Squash Championships
Anahat Singh Squash Championshipsesakal
Updated on

Anahat Singh Squash Championships : भारताची युवा स्क्वाशपटू अनहत सिंगने एशियन ज्युनिय स्क्वाश वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. अनहत सिंगने 17 वर्षाखालील वयोगटात खेळत ही सुवर्ण कामगिरी केली. ही स्पर्धा 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान झाली. अंतिम सामन्यात 15 वर्षाच्या अनहत सिंगने हाँग-काँगच्या एना क्वाँगचा 3 - 1 असा पराभव केला.

Anahat Singh Squash Championships
ISSF World Championships : भारताने जागतिक नेमबाजी स्पर्धेत पटकावले तिसरे सुवर्ण

अनहतने मलेशियाच्या डॉयसी लीचा क्वार्टर फायलमध्ये तर मलेशियाच्यात व्हिटनी इताबेल विलसनचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. गेल्या वर्षी थायलंडमध्ये दिल्लीच्या अनहतने या स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक जिंकले होते.

भारताची ही युवा स्क्वाशपटू पहिल्यांदा 2019 मध्ये प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी तिने 11 वर्षाखालील ब्रिटीश ज्युनियर ओपन स्क्वाश स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिने 13 वर्षाखालील डच ज्युनियर स्क्वाश स्पर्धा जिंकली होती.

Anahat Singh Squash Championships
Jacques Kallis : 47 वर्षाच्या जॅक कॅलिसचा जलवा, 8 चौकार अन् 3 षटकारांची केली आतषबाजी

अनहत ही 2021 मध्ये देखील नोएडा येथे झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेत क्वार्टर फायलनपर्यंत मजल मारली होती. अनहतने 2022 मध्ये झालेल्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत देखील भारताचे प्रतिनिधित्व केलं होते. त्यावेळी 14 वर्षाची असलेली अनहत ही स्पर्धेतील सर्वात युवा भारतीय खेळाडू देखील ठरली होती.

या वर्षाच्या सुरूवातीला अनहतने 15 वर्षाखालील ब्रिटीश ज्युनियर ओपन स्क्वाश स्पर्धेत देखील विजेतेपद पटकावले होते. तिने अंतिम सामन्यात इजिप्तच्या हाझेमचा पराभव केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.