Andre Russell : 2 वर्षांनंतर संघात आला अन् पहिल्याच सामन्यात केला कहर

Andre Russell Show After 2 Years WI vs ENG 1st T20I marathi news
Andre Russell Show After 2 Years WI vs ENG 1st T20I marathi news
Updated on

Andre Russell Show After 2 Years WI vs ENG 1st T20I : अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचे 2 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. आपल्या पुनरागमन सामन्यात या स्टार अष्टपैलू खेळाडूने बॉल आणि बॅटने चमकदार कामगिरी केली आहे.

रसेलने आधी गोलंदाजीत धडाका लावला आणि नंतर फलंदाजीत स्फोटक धावा करत आपल्या संघाला झंझावाती विजय मिळवून दिला. या विजयासह यजमान वेस्ट इंडिज संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. रसेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Andre Russell Show After 2 Years WI vs ENG 1st T20I marathi news
Team India Squad U19 WC 24 : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! 'या' खेळाडूकडे संघाची धूरा

द आंद्रे रसेल शो

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आंद्रे रसेलने वेस्ट इंडिजकडून चेंडू आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने पहिल्याच चेंडूवर 19 धावांत 3 बळी घेत आश्चर्यकारक कामगिरी केली, तर केवळ 14 चेंडूंचा सामना करताना त्याने 29 धावा करून संघाला विजय मिळून दिला. रसेलसाठी हा पुनरागमन सामना होता. जिथे त्याला 2 वर्षांनंतर टी-20 संघात खेळण्याची संधी मिळाली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर

केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाऊन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 171 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर फिल सॉल्टने 40 धावा केल्या तर कर्णधार आणि यष्टीरक्षक जोस बटलर 39 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लियाम लिव्हिंगस्टोनने 27 धावांचे योगदान दिले. विल जॅक 17 धावा करून बाद झाला तर बेन डकेट 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेलने 4 षटकांत 19 धावा देत 3 बळी घेतले, तर अल्झारी जोसेफनेही 3 बळी घेतले. रोमारिया शेफर्डने दोन गडी बाद केले.

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने वेगवान सुरुवातही केली, पण 32 धावांवर त्याला पहिली विकेट गमवावी. यानंतर काईल मेयर्स आणि शाई होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. पण शेवटी संघ थोडा अडकलेला दिसला.

वेस्ट इंडिजने 14.4 षटकात 123 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. येथून आंद्रे रसेल आणि रोमन पॉवेलने वेगवान फलंदाजीला सुरुवात केली आणि 21 चेंडूत 49 धावांची भागीदारी केली. दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने 11 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.