प्रितीच्या पंजाबला पहिला दणका; Andy Flower लखनऊचे कोच

राहुलआधी या फ्रेंचायझींनी पंजाबच्या त्याफ्यातील कोचिंग स्टाफला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.
Preity Zinta AND Andy Flower
Preity Zinta AND Andy FlowerSakal
Updated on

IPL 2022: झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार अँडी फ्लावर (Andy Flower) आगामी आयपीएलमध्ये नव्या फ्रेंचायझी संघाला कोचिंग करताना दिसणार आहेत. लखनऊ फ्रेंचायझी टीमने (Lucknow Franchise) त्यांची मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach ) नियुक्ती केली आहे. फ्लावर मागील दोन आयपीएल हंगामात बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) सह मालक असलेल्या पंजाब किंग्जसोबत (PBKS) सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिका बजावताना दिसले होते.

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 15 व्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवे संघ मैदानात उतरणार आहेत. लखनऊ संघ कोणत्या नावाने खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सुरुवातीपासून लखनऊ फ्रेंचायझी टीम प्रकाशझोतात आहे. मागील दोन वर्षांपासून पंजाब किंग्ज (PBKS) संघाचे नेतृत्व करत असलेल्या लोकेश राहुलसाठी (KL Rahul) लखनऊ फ्रेंचायझी मोठी रक्कम मोजणार असल्याची चर्चा रंगली होती. लोकेश राहुलआधी या फ्रेंचायझींनी पंजाबच्या त्याफ्यातील कोचिंग स्टाफला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.

Preity Zinta AND Andy Flower
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी

संजीव गोयंका यांच्या मालकीच्या फ्रेंचायझी लवकरच लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेतल्याची घोषणाही करु शकते. गोयंका यांच्या नेतृत्वाखालील आरपी-एसजी समुहानं लखनऊ फ्रेंचायझी संघासाठी 7090 कोटी रुपये मोजले होते. नव्या फ्रेंचायझी संघाने पंजाबला हा पहिला धक्का दिला असून लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेत आणखी एक मोठा धक्का देण्याच्या ते तयारीत आहेत.

Preity Zinta AND Andy Flower
पाकचा धुव्वा! हॉकी इंडियानं गाठली Asian Champions Trophy ची सेमी

फ्लावर यांच्या एका निवेदनानुसार, नव्या फ्रेंचायझीसोबत काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी फ्रेंचायझीचे आभारही मानले आहेत. 1993 मध्ये पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आलो होतो. तेव्हापासून भारतात खेळणं आणि या ठिकाणी कोचिंग करणं आवडतं, असा उल्लेख त्यांनी निवेदनामध्ये केला आहे.

कोचिंगचा दांडगा अनुभव

अँडी फ्लावर यांच्याकडे कोचिंगचा चांगलाच अनुभव आहे. त्यांनी इंग्लंडच्या राष्ट्रीय संघालाही मार्गदर्शन केले आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासोबत त्यांनी एक दशकभर काम केले आहे. 2020 मध्ये त्यांनी आयपीएलमध्ये एन्ट्री मारली. अनिल कुंबळेंच्यासोबत त्यांनी पंजाब संघाला मार्गदर्शनाचे धडे दिले. सहाय्यक कोच पदावरुन आता ते प्रमुख कोचच्या रुपात आयपीएलच्या रिंगणात उतरतील. क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार जर लोकेश राहुल लखनऊच्या ताफ्यातून खेळताना दिसला तर तोच संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.