मोठी बातमी : Copa America जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती

Copa America Final - दोन कोपा अमेरिका जेतेपदं, १ वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिनाच्या खेळाडूची निवृत्ती
Angel Di Maria retires from Argentina
Angel Di Maria retires from Argentina sakal
Updated on

Angel Di Maria retires from Argentina after Copa America Final: ९० मिनिटांच्या निर्धारीत वेळेत गोलशून्य बरोबरी राहिल्याने अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया या फायनल सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत खेळला गेला. कोपा अमेरिका स्पर्धेचे पहिले जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या कोलंबियाने गतविजेत्या अर्जेंटिनाला तोडीसतोड टक्कर दिली. त्यात दुखापतीमुळे लिओनेल मेस्सीला ( Lionel Messi) बाहेर जावे लागल्याने अर्जेंटिनाची बाजू कमकुवत झाली होती. पण, तरीही त्यांनी दमदार खेळ केला आणि ११२ व्या मिनिटाला लौटारो मार्टिनेझ ( Lautaro Martinez) याचा गोल विजयात निर्णायक ठरला.

अर्जेंटिनाने १-० अशा फरकाने कोलंबियाला नमवून कोपा अमेरिका स्पर्धेचे ऐतिहासिक सोळावे जेतेपद नावावर केले. त्यांच्यापाठोपाठ उरुग्वे हा सर्वाधिक १५ कोपा अमेरिका जेतेपद जिंकणारा संघ आहे. या ऐतिहासिक विजयानंतर अर्जेंटिनाच्या संघातील महान खेळाडूंपैकी एक एंजल डी मारिया ( Angel Di Maria Retire ) याने निवृत्ती जाहीर केली. ''जेतेपदाच्या ट्रॉफीसह राष्ट्रीय संघातून निवृत्ती स्वीकारायची, हे माझं स्वप्न होतं. अर्जेंटिना हे माझं प्रेम आहे आणि माझा देश आहे. धन्यवाद,''अशी प्रतिक्रीया डी मारियाने सामन्यानंतर दिली.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपल्या कारकीर्दिचा शेवट असा गोड व्हावा अशी इच्छा असते आणि मारियाच्या नशिबी ते आले. २००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत डी मारिया पहिल्यांदा अर्जेंटिनाकडून खेळला आणि संघाने सुवर्णपदक जिंकले होते.

Angel Di Maria retires from Argentina
Lionel Messi Crying : लिओनेल मेस्सी ढसाढसा रडला; संघाचा विजय नव्हे, तर 'त्या' गोष्टीमुळे अश्रूंचा फुटला बांध

डी मारियाने नोव्हेंबर २०२३ मध्येच यंदाची कोपा अमेरिका ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कोपा अमेरिका जिंकूनच निरोप घेण्याचा निर्धार त्याने केला होता आणि अर्जेंटिनाने त्याचे स्वप्न पूर्ण केले.

डी मारियाने १४४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३१ गोल केले. तो २०२२ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता आणि २०१४च्या वर्ल्ड कप उपविजेत्या संघातही तो होता. याशिवाय त्याने २०२१ ची कोपा अमेरिका स्पर्धाही जिंकली आणि २०१५ व २०१६च्या उपविजेत्या संघाचा तो सदस्य होता. २०१९च्या कोपा अमेरिकेत कांस्यपदक त्याच्या जिंकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.