अँजेलो मॅथ्यूज 'टाईम आऊट' नव्हता, श्रीलंकेच्या खेळाडूने ICC ला दिला पुरावा अन् विचारला मोठा प्रश्न

Angelo Mathews Conservancy
Angelo Mathews Conservancy
Updated on

विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी इतिहास रचला गेला जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांमध्ये प्रथमच एखाद्या क्रिकेटरला 'टाइम आऊट' घोषित करण्यात आले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात ही घटना घडली. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'टाईम आऊट' झालेला पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शकिब अल हसनच्या अपीलवर पंचांनी हा निर्णय घेतला.

दरम्यान अँजेलो मॅथ्यूजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यांनी पुरावा दिला तसेच आयसीसीला प्रश्न विचारला आहे. अँजेलो मॅथ्यूजने तो वेळेवर क्रीझवर उभा राहिल्याने तो वेळेनुसार नाबाद असल्याचा पुरावा दिला आहे. तसेच सामन्याच्या शेवटी हस्तांदोन न केल्याने देखील मोठा वाद निर्माण झाला आहे.

अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'टाईम आऊट' झालेला पहिला फलंदाज ठरला. बांगलादेश कर्णधार शाकिब अल हसनने एका क्षेत्ररक्षकाच्या विनंतीवरून मैदानावरील पंचांना मॅथ्यूजला 'टाईम आऊट' आवाहन केले. सुरवातीला पंचांना हा विनोद वाटला, पण शाकिब गंभीर होता आणि अशा स्थितीत मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आले. (World-Cup News)


या मुद्द्यावर मॅथ्यूजने 'एक्स' वर आपला पुरावा दिला की तो दोन मिनिटांच्या वेळेपूर्वीच क्रीजवर पोहोचला होता. मॅथ्यूज म्हणाला चौथ्या अंपायरचा निर्णय चुकीचा आहे. व्हिडिओ पुरावा आहे की हेल्मेट तुटण्याआधी माझ्याकडे अजून 5 सेकंद होते, चौथा अंपायर हे करेक्ट करु शकतात का?माझ्यामते खेळाडूची सुरक्षा सर्वोपरि आहे, कारण हेल्मेटशिवाय मी गोलंदाजाचा सामना करू शकत नव्हतो.

Angelo Mathews Conservancy
ODI WC 2023 : सामना संपल्यानंतरही थांबला नाही राडा! श्रीलंकन खेळाडूंनी टाळले हस्तांदोलन अन्...

सोशल मीडियावर मॅथ्यूजने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये एका फोटोत बांगलादेशचा खेळाडू झेल घेत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो दोन मिनिटांत क्रीजवर आला आहे. पण चेंडू खेळण्यापूर्वी त्याने त्याच्या हेल्मेटचा पट्टा ओढला आणि तो तुटला.

दरम्यान शाकिब आणि बांगलादेशने अपील केले. त्यानंतर मैदानावरील पंचांनी मॅथ्यूजला बाद घोषित केले. जर हे खरे असेल तर साहजिकच ही मोठी चूक आहे. मात्र, जर खेळाडू क्रीजवर पोहोचला असेल आणि त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला असेल, तर फलंदाजाला काही सेकंदांचा वेळ देता आला असता. (Latest Marathi News)

मात्र, पंच आणि बांगलादेश संघाच्या कर्णधाराने हे मान्य न करता मॅथ्यूजला'टाईम आऊट'आवाहन केले. 

Angelo Mathews Conservancy
Timed Out Controversy : सचिनचा घोळ अन् गांगुली ठरला असता टाईम आऊटचा बळी... काय घडलं होतं नेमकं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.