भारताच्या 'या' खेळाडूने 7 दिवसात कमावले 16.7 कोटी; IPL चे श्रीमंतही पडले मागे

Anirban Lahiri Indian Golf Player won 16.7 crore in 7 days
Anirban Lahiri Indian Golf Player won 16.7 crore in 7 days ESAKAL
Updated on

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट वर्तुळात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून संबोधली जाते. याच स्पर्धेत संघ, बीसीसीआय (BCCI) आणि खेळाडू देखील मालामाल होतात. आयपीएल (IPL 2022) खेळाडूंचा खिसा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत गरम करते. त्यामुळे आयपीएल आणि त्यात खेळाडूंनी केलेली कमाई कामय चर्चेत असते. मात्र आता आयपीएलच्या जोरावर गर्भ श्रीमंत झालेल्या या क्रिकेटपटूंना लाजवणारी कमाई अनिर्बान लाहिरी (Anirban Lahiri) या भारतीय गोल्फपटूने (Indian Golf Player) केली आहे.

Anirban Lahiri Indian Golf Player won 16.7 crore in 7 days
PAK vs AUS: बाबरचे 25 महिन्यानंतर शतक त्यावर अश्विनचे ट्विट

आयपीएलमध्ये काही खेळाडूंला दोन महिने चालणाऱ्या एका हंगामासाठी 16-17 कोटी रूपये मिळतात. लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलला संघाने 17 कोटी रूपये दिले आहेत. तर रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांना प्रत्येकी 16 कोटी रूपये मिळाले आहेत. या सर्वांना ही रक्कम एका हंगामासाठी मिळते. मात्र भारताच्या अनिर्बान लाहिरी (Anirban Lahiri) या गोल्फपटूने कमाईच्या बाबतीत या सर्वांना मागे टाकले आहे. लाहिरीने 7 दिवसात 2.17 मिलियन डॉलर म्हणजेच (16.7 कोटी) रूपये कमावले आहेत. विशेष म्हणजे लाहिरी प्लेयर्स चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपदापासून एका शॉट दूर राहिला.

Anirban Lahiri Indian Golf Player won 16.7 crore in 7 days
पीएसएल पैशात लोळणार; रमीझ राजा आयपीएलची कॉपी करणार

अनिर्बान लाहिरी या अनुभवी व्यावसायिक गोल्फपटूने जबरदस्त कमबॅक करत 21 लाख 80 हजार डॉलरची कारकिर्दितील सर्वश्रेष्ठ प्राईज मनी देखील जिंकली. मिळालेल्या माहितीनुसार एका आठवड्यात सर्वाधिक पैसे कमवणारा भारतीय खेळाडू बनला आहे. शेवटच्या राऊंडमध्ये 69 गुण मिळवणाऱ्या लाहिरीला सामना प्ले ऑफमध्ये नेण्यासाठी 18 व्या होल मध्ये बर्डीची गरज होती. मात्र तो चुकला. ऑस्ट्रेलियाचा कॅमरन स्मिथने अंतिम फेरीत मुसंडी मारत विजेतेपद पटकावले. पराभवानंतर लाहिरी म्हणाला की, 'मला जिंकायचे होते. मी गेल्या सात वर्षापासून इथे खेळत आहे. मात्र कधी विजेतेपद पटकावता आले नाही. आज माझ्याकडे विजेतेपद जिंकण्याची चांगली संधी होती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.