भारताचा ३ वर्षांचा Chess प्लेअर अनीशचा मोठा पराक्रम! कमी वयात मिळवलं FIDE रेटिंग

Anish Sarkar FIDE Rating: अवघ्या साडेतीन वर्षांचा असतानाही चेसमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अनीशने फिडे रेटिंग मिळवलं आहे.
Anish Sarkar become youngest-ever FIDE rated chess player
Anish Sarkar become youngest-ever FIDE rated chess playerSakal
Updated on

Chess News: भारतात सध्या बुद्धीबळ खेळाला मोठी चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. भारतातील अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. अशात आता अवघ्या ३ वर्षाच्या अनीश सरकारने मोठा विक्रम केला आहे. त्याने फिडे चेस रेटिंगमध्ये स्थान मिळवले आहे.

अनीश कोलकातामध्ये राहत असून आता तो फिडे रेटिंग मिळवणारा जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याला जेव्हा फिडे रेटिंग मिळाले, तेव्हा त्याचे वय तीन वर्षे, ८ महिने आणि १९ दिवस होते.

अनीशचा जन्म २६ जानेवारी २०२१ रोजी झाला आहे. त्याने आत्तापर्यंत विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Anish Sarkar become youngest-ever FIDE rated chess player
Chess Olympiad 2024: भारताचं पहिलं ऑलिम्पियाड... पाकिस्तान - अफगाणिस्तान ट्रेनप्रवास अन् २०२४ मधील सुवर्णपदक; संघर्षमयी प्रवास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.