Syed Mushtaq Ali Trophy : अनमोलप्रीतचं फायनलमध्ये शतक; कृणाल पांड्याच्या संघाची केली धुलाई

Syed Mushtaq Ali Trophy
Syed Mushtaq Ali Trophyesakal
Updated on

Syed Mushtaq Ali Trophy : मोहाली येथे पंजाब आणि बडोदा संघात आज सईद मुश्ताक अली ट्रॉफीची फायनल खेळवण्यात येत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात 4 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला आहे. पंजाबकडून अनमोलप्रीतने 61 चेंडूत 113 धावांची शतकी खेळी केली तर त्याला नेहल वधेराने 27 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

Syed Mushtaq Ali Trophy
Riyan Parag : देशांतर्गत क्रिकेट हादरवून सोडणाऱ्या रियानचं नशीब उघडणार, ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका खेळणार?

सईद मुश्ताक अली ट्रॉफी टी 20 स्पर्धेत आज अंतिम सामन्यात बडोदाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कृणाल पांड्याचा हा निर्णय बडोदाच्या गोलंदाजांना योग्य ठरवला. पहिल्याच चेंडूवर सोपारियाने अभिषेक शर्माला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर प्रभसिमरनला 9 धावांवर शेठने बाद केले.

पहिल्या 4 षटकातच पंजाबची अवस्था 2 बाद 18 धावा अशी झाली होती. मात्र अनमोलप्रीत आणि कर्णधार मनदीपने 62 धावांची भागीदारी रचली. मनदीप 32 धावा करून बाद झाल्यानंतर नेहल वधेराने अनमोलप्रीत सोबत 138 धावांची खणखणीत भागीदारी रचली.

अनमोलप्रीतने 61 चेंडूत 113 धावांची शतकी खेळी केली. त्यात 10 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचा जोडीदार नेहल वधेराने 27 चेंडूत नाबाद 61 धावा ठोकल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

Syed Mushtaq Ali Trophy
Ravindra Jadeja : पहिल्या दिवसापासूनच मी कर्णधारासारखा विचार करतो मात्र... जडेजाने कोणाला काढला चिमटा?

पंजाबच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना बडोदा संघाची देखील सुरूवात खराब झाली होती. जोत्सनिल सिंह 4 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर निनाद राठवाने 22 चेंडूत 47 धावा चोपल्या. मात्र त्याची खेळी मार्कंडेयन संपवली. यानंतर अभिमन्यू सिंगने संघाला 10 षटकात 2 बाद 89 धावांपर्यंत पोहचवले. त्याच्या साथीला कर्णधार क्रुणाल पांड्या आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.