Asian Games : एशियन गेम्स 2023 मध्ये आज आठव्या दिवशी देखील शुटिंग टिमने पदकांचा धडाका कायम ठेवले. महिला संघाने ट्रॅप शुटिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर लगेचेच पुरूष संघाने सुवर्ण पदक जिंकत भारताची सुवर्ण संख्या 11 वर नेली.
विशेष म्हणजे पुरूष ट्रॅप संघाने एशियन गेम्समध्ये 361 गुण मिळवत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. याचबरोबर ट्रॅप शुटिंग वैयक्तिक प्रकारात कयनन चेनाई आणि झोरावर सिंह हे दोघेही अंतिम फेरीत गेले आहेत. तर महिला वैयक्तिक ट्रॅपमध्ये देखील मनिषा कीरने अंतिम फेरी गाठली आहे.
भारतीय पुरूष ट्रॅप शुटिंग संघात कयनन, झोरावर सिंह आणि पृथ्वीराज यांचा समावेश होता. त्यांनी सांघिक कामगिरी करत देशासाठी सुवर्ण कामगिरी केली. त्यांनी एकूण 361 गुण मिळवले. तर कुवेतच्या संघाला 351 गुणच मिळवता आले.
भारताने आज आठव्या दिवशी एशियन गेम्समध्ये आतापर्यंत दोन रौप्य तर एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. शुटिंगमध्ये पुरूष संघाने सुवर्ण पदक मिळवले. तर महिला संघाने रौप्य पदकाची कमाई केली. याचबरोबर गोल्फमध्ये देखील आदिती अशोकने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. ती एशियन गेम्समध्ये रौप्य पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.