ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेची धडाडणारी तोफ झाली निकामी; 465 विकेट्स घेणार गोलंदाज वर्ल्डकपला मुकला

ODI World Cup 2023
ODI World Cup 2023esakal
Updated on

ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी अनेक देशांच्या संघाला दुखापतींचा मोठा फटका बसत आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक तगडा झटका बसला आहे. त्यांचा अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज दुखापग्रस्त झाला असून तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला मुकणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्त्जे हा सातत्याने 150 किमी प्रती तास वेगापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तो दुखापतीमुळे भारतात होणारा वनडे वर्ल्डकप खेळू शकणार नाही. हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नॉर्त्जेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा सिसांडा मगाला हा गोलंदाज देखील दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार आहे.

ODI World Cup 2023
Asian Games 2023 : 3189 पदकं जिंकून कोणत्या देशानं एशियन गेम्समध्ये निर्माण केलाय आपला दबदबा?

नॉर्जेला पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेदरम्यान आपल्या पाठीचे स्कॅन करून घेतले होते. त्यावेळी त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला भारतात होणारा वर्ल्डकप खेळता येणार नाहीये.

दुसरीकडे मगालाला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दुखापत झाली होती. त्याचा गुडघा दुखावला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेदरम्यान त्याची ही दुखापत अजून बळावली. त्यामुळे त्याला खबरदारीचा उपाय म्हणून संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

याबाबत बोलताना रॉब वॉल्टर म्हणले की, 'नॉर्त्जे आणि सिसांडाचे वर्ल्डकपला मुकणे निराशाजनक आहे. दोघेही दर्जेदार खेळाडू आहेत. ते प्रोटेआससाठी बहुमूल्य आहेत. आम्ही त्यांना संघात लवकरात लवकर परतण्यासाठी लागणारी सर्व मदत आणि सहाय्य करणार आहोत.'

'नॉर्त्जे आणि सिसांडा यांच्या अनुपस्थितीत अँडिले आणि लिझाड यांना वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलं होते.'

ODI World Cup 2023
IND vs AUS : एक भारतीयच ठरणार भारताची डोकेदुखी; 21 वर्षाचा युवा गोलंदाज भल्या भल्यांची भंबेरी उडवणार?

दरम्यान, नॉर्त्जेची उणीव दक्षिण आफ्रिकेला भारतात नक्कीच जाणवणार आहे. कारण नॉर्त्जेकडे आयपीएलमुळे भारतात खेळण्याचा चांगला अनुभव होता. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 465 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 234, अ श्रेणी क्रिकेटमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 19 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 70 तर 22 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 आणि 31 टी 20 सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com