केप टाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आणि त्याच दरम्यान, विराट कोहलीच्या मुलगीचा वामिकाची (Virat Kohli Daughter Vamika) पहिली झलक प्रेक्षकांना दिसली. विराटचे अभिनंद करण्यासाठी उभा राहिलेल्या अनुष्काच्या (Anushka Sharma) कडेवर बसलेल्या वामिकाने देखील बाबांच्या अर्धशतकाचे अभिनंदन केले. याचा व्हिडिओ आणि वामिका कोहलीची पहिली झलक वाऱ्याच्या वेगाने पसरली. (Anushka Sharma Statement After Daughter Vamika Kohli First Image Gone Viral)
अनेक दिवसांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma) आपल्या मुलीचा चेहरा माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचवत होते. हे दोघेही वामिकाचा चेहरा (Vamika Face) दिसत असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्हते. यामागे जोपर्यंत वामिका कळत्या वयाची होणार नाही तोपर्यंत तिला माध्यमं आणि सोशल मीडियापासून दूर ठेवत तिचे आयुष्य जगण्याची मुभा देण्याचा उद्येश आहे. दरम्यान, तिसऱ्या सामन्यादरम्यान वामिकाची झलक व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्माने सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
ती आपल्या पोस्टमध्ये लिहिते 'आम्हाला मैदानात आमच्या मुलीचा फोटो कॅमेऱ्यात टिपला गेल्याची जाणीव झाली. तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हयरल होत आहे. मला तुम्हाला सांगयचे आहे की आमचे लक्ष नसताना हे घडले. आमच्यावर कॅमेरा आहे हे आम्हाला कळलेच नाही. आमचा वामिकाच्या फोटोंबाबतची आमची भुमिका अजूनही बदलली नाही. अजूनही आमची इच्छा आहे की वामिकाचा फोटो काढण्यात येऊ नये. याबाबतची कारणे आधी सांगितली आहेत तीच आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.