महिला रिकर्व्ह संघाचे रुपेरी यश

तिरंदाजी विश्वकरंडक; चायनीज तैपेईच्या संघाकडून १-५ ने पराभूत
Archer Deepika Kumari
Archer Deepika Kumarisakal
Updated on

पॅरिस : दीपिका कुमारी, सिमरनजीत कौर आणि अंकिता भकत या भारतीय महिला रिकर्व्ह त्रिकुटाचा तिरंदाजी विश्वकरंडकाच्या रविवारी झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत चायनीज तैपेईच्या संघाकडून १-५ असा पराभव झाला. त्यामुळे त्यांना या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम दिवशी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चायनीज तैपेईच्या लेई चियान-यिंग, पेंग चिया-माओ आणि कुओ त्झू यिंग या त्रिकुटाने तिसऱ्या सेटमध्येच सामना संपवताना १६८-१५३ अशा एकतर्फी फरकासह विजय मिळवला. चायनीज तैपेईने पहिला सेट ५६-५३ ने जिंकला; तर १३ व्या मानांकित भारतीयांनी दुसरा सेटमध्ये ५६ गुण घेताना बरोबरी साधण्यासाठी दोन गुणांचा दावा केला. तैपेईच्या त्रिकुटाने मात्र तिसऱ्या सेटमध्ये सातत्य राखताना ५६-५३ असे गुण घेत १-५ अशी अभेद्य आघाडी घेतली आणि सुवर्णपदक जिंकले.

गेल्या २४ तासांच्या अंतरात भारताचे हे तिसरे पदक होते; कारण याआधी भारताने कंपाउंड तिरंदाजांनी मिश्र सांघिक आणि महिला वैयक्तिक अंतिम फेरीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले होते. पुढे ढकलण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आल्यापासून पुनरागमनाच्या मार्गावर असणारी ज्योती सुरेखा वेन्नम चांगल्या फॉर्ममध्ये परतली आहे, कारण तिने प्रथम अभिषेक वर्मासोबत सुवर्णपदकासह नंतर महिलांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत रौप्यपदक पटकावून आपली चुणूक दाखवली आहे.

भारत दुसऱ्या स्थानावर

सहा सुवर्णांसह पदकतालिकेत अव्वल असलेल्या पॉवरहाऊस दक्षिण कोरियानंतर, भारत आपल्या तीन पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, ग्रेट ब्रिटनने आता भारताच्या सुवर्ण संख्येशी बरोबरी साधली आहे, केवळ भारताच्या एकूण ९ पदकांमुळे ते तिसऱ्या‍ स्थानावर आहेत, दक्षिण कोरियाचीही एकूण पदकसंख्या ९ इतकी आहे. तिरंदाजी विश्वकरंडकाचा चौथा टप्पा पुढील महिन्यात कोलंबियामध्ये होणार आहे, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोत विश्वकरंडकाची अंतिम फेरी पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.