Copa America : अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत? कॅनडाची आज अग्निपरीक्षा

लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना फुटबॉल संघ कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेतील उद्या (ता. ९) होत असलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाचा सामना करील. कॅनडाचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहे.
argentina and canada playing for a second time at copa america
Copa America Sakal
Updated on

न्यू जर्सी (अमेरिका) : लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना फुटबॉल संघ कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेतील उद्या (ता. ९) होत असलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाचा सामना करील. कॅनडाचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहे.

जेसे मार्च यांच्या मार्गदर्शनात कॅनडाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे; पण गतविजेत्या अर्जेंटिनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. कॅनडासाठी अर्जेंटिनाचा पेपर सोपा नसेल एवढे मात्र निश्‍चित आहे.

अर्जेंटिना-कॅनडा हे दोन्ही संघ साखळी फेरीमध्ये एकाट गटात होते. अ गटात दोन्ही देशांचा समावेश होता. अर्जेंटिना संघाने ही लढत २-० अशी जिंकली. ज्युलियन अल्वारेझ व लौतारो मार्टिनेझ यांनी गोल करीत अर्जेंटिनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

या लढतीबाबत कॅनडा संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसे मार्च म्हणाले, अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत आम्ही सर्वोत्तम खेळ केला; पण तरीही आम्ही विजयापासून दूर राहिलो. मात्र, त्या पराभवाने आम्ही बिथरलो नाही. उपांत्य लढतीत आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊ.

सेमी फायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ

उत्तर व मध्य अमेरिका आणि कॅरेबियन संघटना (सीओएनसीएसीएएफ) या खंडातील देशांनाही कोपा अमेरिका या स्पर्धेमध्ये आमंत्रित केले जाते. कॅनडा हा देशही या खंडामधील. कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा कॅनडा हा या खंडातील चौथा देश ठरला आहे.

तसेच, पदार्पणात उपांत्य फेरीत पोहोचणारा कॅनडा हा तिसरा देश ठरला आहे. याआधी या खंडातील मेक्सिको देशाने १९९३मध्ये या स्पर्धेत उपविजेता होण्याचा मान संपादन केला होता. होडुंरस २००१मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला होता. १९९५मध्ये अमेरिकेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

मैदानावर टीका

अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या मैदानांवर टीका केली आहे. या स्पर्धेदरम्यान अव्वल दर्जाची मैदाने वापरण्यात आलेली नाहीत. मियामी येथील खेळपट्टी थोडी तरी समाधानकारक होती, असे त्यांचे म्हणणे आहे.

दृष्टिक्षेपात

- मागील आठ अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी सातमध्ये अर्जेंटिना संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

- उत्तर व मध्य अमेरिका आणि कॅरेबियन संघटना (सीओएनसीएसीएएफ) या खंडातील देशांविरुद्ध मागील दहा सामन्यांत अर्जेंटिनाने विजय मिळवले आहेत. मागील सहा सामन्यांत अर्जेंटिनाने प्रतिस्पर्ध्यांना गोलही करू दिलेला नाही.

- अर्जेंटिना संघाने २००४ ते २०२४ या वर्षांमध्ये झालेल्या आठ कोपा अमेरिका स्पर्धांमधील सातमध्ये किमान उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच, पाच स्पर्धांमध्ये अर्जेंटिना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

argentina and canada playing for a second time at copa america
Copa America Qualifiers : उरुग्वेची उपांत्य फेरीत धडक! ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

मेस्सी तंदुरुस्त?

लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाचा महान खेळाडू. कोपा अमेरिका व विश्‍वकरंडक या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांच्या जेतेपदावर मोहर उमटवणाऱ्या अर्जेंटिना संघाचा तो सदस्य राहिला आहे. यंदा त्याच्यासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीआधी त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्‍नचिन्ह होते. आता उपांत्य लढतीत तो तंदुरुस्त आहे का, असा प्रश्‍न याप्रसंगी उभा ठाकला आहे.

कोपा अमेरिका, उपांत्य फेरी

अर्जेंटिना-कॅनडा बुधवारी,

पहाटे ५.३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.