FIFA WC22: फायनल अर्जेंटिना अन् फ्रान्सची दंगल केरळमध्ये, एकाचा मृत्यू

Argentina France fans clash in Kerala after World Cup final
Argentina France fans clash in Kerala after World Cup finalsakal
Updated on

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिनाने ट्रॉफी आपल्या नावे केली. या रोमहर्षक सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट्स आले. कधी अर्जेंटिनाचा संघ सहज जिंकेल असे वाटत होते तर कधी फ्रान्सने माघारी येऊन टेबल फिरवले. अशा परिस्थितीत अतिरिक्त वेळेनंतर सामना 3-3 असा बरोबरीत सुटला आणि पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. यामध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.(Argentina France fans clash in Kerala after World Cup final)

Argentina France fans clash in Kerala after World Cup final
FIFA WC Final: 'गोल्डन ग्लोब' ट्रॉफीसोबत अर्जेंटिनाच्या गोलकीपरने केले अश्लील कृत्य

या विजयाचा संपूर्ण जगात जल्लोष करण्यात आला. भारतातील लोकांनीही या सामन्याचा आनंद लुटला. सामना संपल्यानंतर अर्जेंटिना आणि मेस्सीच्या चाहत्यांनीही विजय साजरा केला. अर्जेंटिनाच्या विजयाचा विशेषत: केरळमध्ये जल्लोष करण्यात आला. मात्र या काळात हिंसक घटनाही समोर आल्या आहेत. केरळच्या कन्नूरमध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिनाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Argentina France fans clash in Kerala after World Cup final
Video : इतका आनंद झाला की, तिनं ब्रा... फायनलमध्ये रंगली तिचीच चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पलियामूलाजवळ घडली. अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी फ्रेंच चाहत्यांना टोमणे मारले, त्यानंतर हिंसाचार झाला. सहा जणांना ताब्यात घेतले असून लवकरच त्यांच्या अटकेचीही नोंद करण्यात येणार आहे. याशिवाय कोची आणि तिरुअनंतपुरममध्येही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. अर्जेंटिनाच्या विजयानंतर आनंद साजरा करणाऱ्या लोकांना हाताळताना दोन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

Argentina France fans clash in Kerala after World Cup final
France Riots FIFA World Cup : पराभवानंतर फ्रान्समध्ये राडा, चाहत्यांनी जाळल्या गाड्या, पोलिसांना...

स्थानिक स्टेडियममधून अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या विजयी मिरवणुकीत अक्षय कुमार या १७ वर्षीय किशोरचा मृत्यू झाला. अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तब्बल 36 वर्षांनी फिफा विश्वचषक जिंकला आहे. मेस्सीने सात गोलांसह स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीत फ्रान्ससाठी हॅटट्रिक करणारा किलियन एमबाप्पे आठ गोलांसह अव्वल स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.