Shooting World Cup : भारताचा युवा नेमबाज अर्जुन बाबुता याने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअररायफल प्रकारात टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या अमेरिकेच्या लुकास कोझेनिस्की याला 17-9 अशा फरकाने हरवत पहिल्या स्थानावर झेप घेतली, हे विशेष. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले, हे विशेष.
अर्जुनने रँकिंग फेरीमध्ये २६१.१ गुणांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले. रौप्यपदक पटकावणाऱ्या कोझेनिक्सी याने २६०.४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. तसेच इस्रायलच्या सर्जी रिचटर याने २५९.९ गुणांची कमाई करीत तिसरे स्थान मिळवले.
अंतिम फेरीत दमदार कामगिरी
अर्जुनने अंतिम फेरीतही दमदार कामगिरी केली. पहिल्या सात शॉटनंतर अर्जुनकडे १०-४ अशी आघाडी होती. अमेरिकेच्या नेमबाजानेही भारताच्या अर्जुनल कडवी झुंज दिली; पण अर्जुनने निर्णायक क्षणी १० गुणांवर निशाणा साधला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ऑस्ट्रियाचे थॉमस फार्निक यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला पहिलेच सुवर्णपदक जिंकता आले.
पार्थ चौथ्या स्थानी
भारताचा आणखी एक नेमबाज या प्रकारात खेळत होता. पार्थ माखीजा हे त्याचे नाव. रँकिंग फेरीमध्ये तो पाचव्या स्थानी राहिला. तसेच अंतिम फेरीत त्याला पदकापासून वंचित राहावे लागले; पण तरीही त्याने २५८.१ गुणांसह चौथे स्थान मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.