Ranji Trophy : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी धुमाकूळ घालत आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनने चंदीगडविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. त्याचे शतक हुकले असले तरी त्याने ज्याप्रकारे धडाकेबाज फलंदाजी केली, त्यामुळे सगळेच प्रभावित झाले. अर्जुन हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि खालच्या फळीत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने या सामन्यात 116.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
अर्जुन तेंडुलकरने 60 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. तो हळुहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, पण अर्सलान खानच्या चेंडूवर कुणाल महाजनने झेल घेत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
चालू मोसमातील आपल्या पहिल्या रणजी सामन्यात अर्जुन तेंडुलकर त्रिपुराविरुद्ध विशेष काही करू शकला नाही. त्याने दोन्ही डावात मिळून 21 धावा केल्या तर गोलंदाजीत 2 बळी घेतले. या सामन्यात गोव्याचा पराभव झाला. गोवा चालू मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या नावावर एक नकोसा विक्रम जोडला गेला होता. त्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध एका षटकात 31 धावा दिल्या होत्या.
आयपीएल 2023 मधील कोणत्याही गोलंदाजाचे हे सर्वात महागडे षटक होते. यासह अर्जुनने गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालच्या लज्जास्पद विक्रमाची बरोबरी केली होती, ज्याने त्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटच्या षटकात 31 धावा दिल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.