Arshdeep Singh : N, N4, N6, अर्शदीप सिंगचे षटक संपेना... हार्दिक जाम वैतागला

Arshdeep Singh 3 No Ball Free Hit
Arshdeep Singh 3 No Ball Free Hit esakal
Updated on

Arshdeep Singh 3 No Ball Free Hit : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंगला संघात आला. अर्शदीपची आधीची कामगिरी पाहता तो आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजी लीड करेल असे वाटले होते. मात्र आपल्या पहिल्याच षटकात आणि सामन्याच्या दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने नो बॉल टाकण्याचा आणि लंकेला फ्री हिट देण्याचा सपाटाच लावला.

Arshdeep Singh 3 No Ball Free Hit
IND vs SL 2nd T20I : श्रीलंकेचा 2016 नंतरचा भारतात पहिला विजय; अक्षर - मावीची झुंज व्यर्थ

अर्शदीपने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर चौकार दिला. त्यानंतर अर्शदीपने आपली लय परत मिळवत सलग दोन चेंडू निर्धाव टाकत पहिल्या चेंडूची भरपाई केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव तर पाचवा चेंडू निर्धाव टाकत आपले षटक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

Arshdeep Singh 3 No Ball Free Hit
Rahul Tripathi : 13 सामने बेंचवर बसल्यानंतर राहुलने अखेर इंडियाची कॅप घातली

मात्र सहाव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने माती खालली. त्याने सहावा चेंडू नो बॉल टाकला त्यावर कुसल मेंडीसला फ्री हिट मिळाली. या चेंडूवर धाव झाली नव्हती. अर्शदीपने फ्री हिटचा चेंडूवर चौकार खाल्ला वर तोही नो बॉल टाकला. त्यामुळे पुढच्या चेंडूवरही मेंडीसला फ्री हिट मिळाली. मेंडीसने त्याचा पुरेपूर फायदा उचलत त्यावरही षटकार मारला. अखेर चौथ्या प्रयत्नात अर्शदीपने राऊंड द विकेट गोलंदाजी करत एक धाव दिली आणि आपले षटक संपवले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला!

मात्र अर्शदीपचा नो बॉल किस्सा इथंच संपत नाही. कर्णधार हार्दिकने या षटकातनंतर अर्शदीपला 18 षटकापर्यंत गोलंदाजी दिली नव्हती. मात्र अखेर हार्दिकने त्याला 19 वे षटक दिले. मात्र त्यातही अर्शदीपने 2 नो बॉल टाकत कहर केला. त्याने दोन नो बॉल टाकत अतिरिक्त 9 धावा दिल्या.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.