Aryna Sabalenka : अमेरिकन ओपन २०२४ स्पर्धा सध्या सुरू असून महिला एकेरीतील अंतिम सामना शनिवारी पार पडला. या अंतिम फेरीत आर्यना सबालेंकाने बाजी मारली आणि तिने महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
अंतिम सामन्यात आर्यनाने जेसीका पेगुलाला दोन चुरशीच्या सेटमध्ये ७-५, ७-५ ने पराभूत करून अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. अमेरिकन ओपनमध्ये एकेरीत तिने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. तसेच तिचे हे एकेरीतील तिसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.
याआधी २०३३ आणि २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त ती २०२१ व २०२३ मध्ये विंबलडन आणि २०२३ फ्रेंच ओपन सेमीफायनलमध्ये देखील पोहचली होती.
अंतिम सामन्यातील दुसरा सेट अत्यंत रोमांचक झाला. या सेटमध्ये आर्यनाने केलेलं पुनरागमन शानदार राहिले. दुसऱ्या सेटमध्ये तर पेगुलाने ३-० ने आघाडी घेतली होती. पेगुलाने ५-३ ने आघाडीही घेतली होती. मात्र, यानंतर आर्यनाने अफलातून पुनरागमन करत पेगुलाला ७-५ ने पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले.
२६ वर्षीय आर्यनाने आपल्या कारर्किदीत ४० विजेतेपदं पटकावली आहेत, तर जागतिक क्रमवारीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हा सामना पाहण्यासाठी सुमारे २३ हजार प्रेक्षक उपस्थित होते. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नोहा लायल्स, स्टार बास्केटबॉलपटू स्टेफ करी आणि फॉर्म्युला-१ वर्ल्ड चॅम्पियन लुईस हॅमिल्टन यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.
बरेचसे प्रेक्षक अमेरिकन पेगुलाचे समर्थन करत होते, परंतु ३० वर्षीय अनुभवी पेगुलाला पराभूत करत आर्यनाने आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रेक्षकांकडून स्वत:चे कौतुक करून घेतले.
आर्यना हिचा जन्म बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे झाला . तिचे वडील सर्जी हे हॉकी खेळाडू होते. पण ती योगायोगाने टेनिस खेळू लागली. ती म्हणाली, "एक दिवस, माझे बाबा मला कारमधून कुठेतरी घेऊन जात होते, आणि वाटेत त्यांनी टेनिस कोर्ट पाहिले. म्हणून ते मला कोर्टवर घेऊन गेले. मला ते खूप आवडले आणि त्याचा आनंद घेतला आणि माझा टेनिस प्रवास सुरू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.