Australian Open 2023 : अरेना सबलेंका ऑस्ट्रेलियन ऑपनची नवी राणी; जिंकले पहिले वहिले ग्रँडस्लॅम

Australian Open 2023
Australian Open 2023esakal
Updated on

Australian Open 2023 : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरेना सबलेंकाने एलेना रबकिनाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत आपले पहिले वहिले ग्रँड स्लॅम जिंकले. रशियाच्या विम्बल्डन विजेत्या रबकिनाने पहिला सेट जिंकत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र अरेनाने जोरदार पुनारागमन करत पुढचे दोन्ही सेट जिंकून आपले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न साकार केले.

Australian Open 2023
Wasim Akram : हे काही गल्लीतलं क्रिकेट नाही... नजम सेठींच्या पवित्र्यावर अक्रम काय म्हणाला?

बेलारूसच्या अरेना सबलेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताच जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. आपले पहिले ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर अरेना म्हणाली की, 'मी अजून थरथरत आहे. मी खूप नर्व्हस आहे. माझी टीम, माझी वेडी टीम असं मी म्हणतो. आम्ही गेल्या वर्षभरापासून खूप चढ उतारातून गेलो आहोत. आम्ही खूप कष्ट केले आहेत. त्यामुळे या ट्रॉफीचे खरे मानकरी तुम्ही आहात. माझ्यापेक्षा तुम्ही खूप महत्वाचे आहात.'

Australian Open 2023
Ab de Villiers : डिव्हिलियर्सने क्रिकेट जगताला दिला इशारा, 'या'वर त्वरित चर्चा झाली पाहिजे

अरेना सबलेंका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिने आतापर्यंतच्या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. तिने एडिलेड इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून 2023 चा हंगामाची सुरूवात केली. तिने आतापर्यंत 11 सामने सरळ सेटमध्ये जिंकले होते.

सबलेंकाने सेमी फायनलमध्ये मागदा लिरेट्टेचा 7-6, 6-2 असा पारभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यापूर्वी तिने टेरेझा आणि शेल्बे यांचा पहिल्या दोन फेरींमध्ये सरळ सेटध्ये पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना मात्र तिला सरळ सेटमध्ये जिंकता आला नाही. तिने रबकिनाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.