Rahul Dravid Coach WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडच्या ओव्हलवर WTC ची फायनल सुरू आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 469 धावा केल्या. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर टीका होऊ लागली. आता पाकिस्तानचे माजी खेळाडू बसित अली यांनी राहुल द्रविड यांच्यावर बोचरी टीका करत कोच म्हणून ते फेल असल्याच्या सांगितले.
पाकिस्तानच्या 52 वर्षांच्या माजी खेळाडू अली यांनी राहुल द्रविड यांच्यावर कोच म्हणून ते शून्य आहेत असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'मी राहुल द्रविडचा खूप मोठा फॅन आहे आणि कायम राहणार. तो एक क्लास प्लेअर, दिग्गज खेळाडू आहे. मात्र कोच म्हणून तो पूर्णपणे शून्य आहे. तुम्ही भारतात फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करता. माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. ज्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जातो त्यावेळी अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या असतात का? तेथे चेंडू उसळी घेण्याऱ्या खेळपट्ट्या असतात. देवालाच माहिती की तो काय विचार करत होता.'
अली यांनी पाकिस्तानकडून 19 कसोटी आणि 50 वनडे सामने खेळले आहेत. ते पुढे म्हणाले की, आता WTC Final ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताला चमत्काराची गरज आहे.
अली पुढे म्हणाले की, 'भारताने पहिल्या दोन तासात ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यांनी सामन्यावरील पकड गमावली. त्यांनी आयपीएलमध्ये जशी गोलंदाजी करतात तशी गोलंदाजी केली. उपहारापर्यंत भारतीय गोलंदाज जसे ते सामनाच जिंकणार असल्यासारखे खूष होते. मात्र आता भारतीय संघाला चौथ्या डावात चमत्कार होण्याची आशा करावी लागणार आहे. 120 षटक भारताने फिल्डिंग केली आहे. मला असे वाटत होते की फक्त 2 ते 3 खेळाडू फिट आहेत. त्यात रहाणे, कोहली आणि जडेजा हेच फिट वाटले. बाकीचे सर्व दमलेले होते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.