पुणे - कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची, शिक्षण, खेळासाठी सभोवतालचे वातावरणही तितकेसे पूरक नाही. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीशी चंद्रीकाने खरोखरच दोन हात करण्याचे ठरविले. मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) या खेळाकडे आपले लक्ष वळविले, आई- वडिलांनी पोटाला चिमटा घेत लेकीला साथ दिली, समाजानेही मदतीचा काही प्रमाणात हात दिला.