The Ashes, 2021-22 Australia vs England, 2nd Test : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांत आटोपला. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने 1 विकेटच्या मोबदल्यात 45 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 282 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 बाद 473 धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि गोलंदाज यांनी आपल्यातील धमाल कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधलं असल तरी इंग्लंडचा अनुभवी जेम्स अँडरसननेही (James Anderson) कमालीची कामगिरी करुन दाखवलीये.
अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून हा विक्रम मोडणं सहज शक्य नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात अँडरसन नाबाद तंबूत परतला. कसोटीच्या इतिहासात 100 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम अँडरसनच्या नावे झाला आहे. 167 व्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनने (James Anderson sets unique batting record) 13 चेंडूत 5 धावांची नाबाद खेळी केली. असा पराक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कर्टनी वॉल्श दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत ते 61 वेळा नाबाद राहिले होते. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा नंबर लागतो. तो 56 वेळा नाबाद राहिला आहे. बॉब विल्स आपल्या कसोटी कारकिर्दीत 55 वेळा नाबाद राहिले आहेत.
सर्वाधिक वेळा नाबाद राहिलेले खेळाडू
जेम्स अँडरसन-100
कर्टनी वॉल्श ...-61
मुथया मुरलीधरन- 56
बॉब विल्स-55
दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीवरही मजबूत पकड बनवली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाअखेर 282 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली आहे. तो रन आउट झाला. पहिल्या डावात त्याने 95 धावा केल्या होत्या.
इंग्लंडकडून डेव्हिड मलान 80 , कर्णधार जो रूट 62 , स्टोक्स 34 आणि क्रिस वोक्स 24 धावा वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक 4 तर लायनने 3 विकेट घेतल्या. ग्रीनने दोन विकेटसह बहुमूल्य योगदान दिले. तर नेसेरनं एक विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.