ENG vs AUS : कांगारूं संघाने प्लेइंग-11 मध्ये केला मोठा बदल! दिग्गज खेळाडूला दिला डच्चू

ENG vs AUS
ENG vs AUS
Updated on

England vs Australia Ashes 2023 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेला आजपासून सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी एजबॅस्टन येथे खेळल्या जात आहे. 2021 मध्ये जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 4-0 असा विजय मिळवला होता. अ‍ॅशेस परत मिळवण्यासाठी इंग्लंडचा डोळा असेल, तर ऑस्ट्रेलियन संघ तो वाचवण्याचा प्रयत्न करेल.

ENG vs AUS
IND vs WI: रोहितसह बड्या खेळाडूंना विश्रांती, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ प्रथम गोलंदाजी करेल. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कला प्लेइंग-11 मधून वगळले आहे. त्याच्या जागी जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे.

ENG vs AUS
Chetan Sharma : स्टिंग ऑपरेशनमुळे राजीनामा देणारा चेतन शर्मा पुन्हा बनला सिलेक्टर, फ्लॉप खेळाडूला बनवले कर्णधार

फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती पाहता इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हा निर्णय घेतला. इंग्लंडने आधीच संघ जाहीर केला होता. मोईन अली जवळपास दोन वर्षांनी पहिली कसोटी खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या जागी जोश हेझलवूडची निवड केली आहे. कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करतील.

ऑस्ट्रेलियाने 2001 पासून इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकलेली नाही पण अलीकडेच भारताला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनले आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.