Ashes ball-change controversy : पराभवाचे खापर बदललेल्या चेंडूवर! कांगारूचे आजी-माजी खेळाडू लागले रडायला

Ashes ball-change controversy
Ashes ball-change controversy
Updated on

Ashes ball-change controversy : बिनबाद १४० आणि ३३४ धावांत संपूर्ण संघ बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील अखेरचा सामना नाट्यमय कलाटणीनंतर गमावला. यादरम्यान चेंडू खराब झाल्यामुळे तो बदलण्यात आला आणि या दुसऱ्या चेडूवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे पराभवाचे खापर बदललेल्या चेंडूवर फोडण्यात आले. त्यात सलामीवीर उस्माव ख्वाजा आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग आघाडीवर होते.

Ashes ball-change controversy
Australian Open : ट्रीसा-गायत्री दुसऱ्या फेरीत; कॅनडाच्या जोडीवर मात

ऑस्ट्रेलियाने अॅशेस स्वतःकडेच राखला असला, तरी अखेरचा कसोटी सामना त्यांना जिंकता आला नाही, याचे शल्य राहिले. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी १४० धावांची सलामी दिली, तेव्हा ऑस्ट्रेलिया विजयी होणार, असे सर्वांना वाटत होते; परंतु त्यावेळी वापरात असलेला चेंडू खराब झाला तो मैदानावरील पंचांनी बदलला आणि बदललेला चेंडू काहीसा नवा होता. त्या चेंडूवर इंग्लंड गोलंदाजांनी कमाल करत बाजी पलटवली.

Ashes ball-change controversy
IND vs WI 3rd ODI : दबदबा अन् दरारा! फलंदाजांनी रचला पाया, गोलंदाजांनी चढवला कळस

चेंडू बदल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर मार्क वूडने टाकलेला उसळता चेंडू ख्वाजाच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर त्याने मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांच्याकडे विचारणा केली. तुलनेने नवा असलेला चेंडू तुम्ही कसा दिला, अशी आपण विचारणा केल्याचे ख्वाजाने सांगितले. या मालिकेत आपण सामना केलेल्या इतर सर्व चेंडूंच्या तुलनेत हा बदललेला चेंडू अधिक टणक होता. तसेच नवा चेंडू लगेचच रिव्हर्स स्विंग होत नाही, असाही आक्षेप त्याने व्यक्त केला.

चेंडू बदलण्यासाठी वापरलेल्या चेंडूंची पेटी आणण्यात आली. त्यात जेवढी षटके झाली होती तेवढी षटके वापरलेले चेंडू नव्हते. होते ते सर्व काहीसे नवेच चेंडू होते, असेही ख्वाजाने सांगितले.

आयसीसीने चौकशी करावी ः पाँटिंग

चेंडू बदलल्यावर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी टीका केली त्यात रिकी पाँटिंग आघाडीवर होता. जुन्या चेंडूच्या बदल्यात काहीसा नवा असलेला चेंडू कसा काय बदलला जाऊ शकतो, आयसीसीने याची चौकशी करावी, अशीही मागणी पाँटिंगने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.