Ashes Series 2023 : येरे येरे पावसा... इंग्लंडचे फाईट बॅक मात्र अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियानेच राखल्या

Ashes Series 2023
Ashes Series 2023esakal
Updated on

Ashes Series 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा अ‍ॅशेस सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या सामन्यात पहिल्या साडेतीन दिवसात इंग्लंडने चांगली पकड निर्माण केली होती. चौथ्या दिवशीच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला पावसाची जोडी मिळाली अन् इंग्लंडच्या चांगल्या खेळावर पाणी फिरले.

अ‍ॅशेस मालिकेतील चौथा सामना हा अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील फक्त एक कसोटी सामना शिल्लक असल्याने जरी इंग्लंडने सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत राहिल आणि अ‍ॅशेस ऑस्ट्रेलिया राखण्यात यशस्वी होईल.

Ashes Series 2023
WI vs IND 2nd Test Day 4 : विंडीजची झुंज, भारताने ठेवले 364 धावांचे मोठे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाने जरी अ‍ॅशेस राखल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियाला ओव्हलमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीत पराभव जरी टाळला तरी ते 2001 नंतर इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच अ‍ॅशेस जिंकतील.

दरम्यान, सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, 'संघाला नक्कीच अभिमान झाला असेल. आमची प्राथमिकता इथे येऊन अ‍ॅशेस जिंकण्याची होती. मात्र आम्ही अ‍ॅशेस राखल्या आहेत. मात्र या खूप चांगल्या परिस्थितीत राखल्या आहेत असं नाही.'

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने तीन दिवस चांगले क्रिकेट खेळून देखील पावसामुळे निकाल मनासारखा लागला नाही तरी गोष्टी समजूतदारपणाने घेतल्या. पाऊस हा एक खेळाचाच भाग असल्याचे त्याने मान्य केले.

Ashes Series 2023
Rohit Sharma : 6,6,6,4,4,4,4,4... विक्रमांचा रतीब! रोहित शर्माने यशस्वी सोबत रचला इतिहास

स्टोक्स म्हणाला, 'आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करतायचं आहे. आमच्या हातात फक्त खेळणं आहे. मात्र खेळात अजून देखील फॅक्टर असतात. मला नाही वाटत की पहिल्या डावात ऑल आऊट करणे आणि 590 धावा करण्यापलीकडे आम्ही याबाबत काही खास करू शकतो.'

'आता आमच्या हातात एक सामना राहिला आहे. आम्ही तो सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करू जसे आम्ही 2019 मध्ये केले होते.'

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 5 बाद 214 धावा केल्या होत्या. ते अजूनही 61 धावांनी पिछाडीवर होते. इंग्लंडने पहिल्या डावात 592 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी देखील पावसामुळे फक्त 30 षटकांचा खेळ झाला होता. त्यामध्ये इंग्लंडला फक्त एक विकेट घेता आली. जो रूटने शतकवीर मार्नस लाबुशेनला बाद केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.