मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes Series AUS vs ENG) तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 31 धावा केल्या. इंग्लंड अजूनही 51 धावांनी पिछाडीवर आहे.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 185 धावात गुंडाळला होता. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना दुसऱ्या दिवशी प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणले. मात्र कांगारुंच्या तळातील फलंदाजांना झुंजार वृत्ती दाखवत संघाला 267 धावांवपर्यंत पोहचवले. जेम्स अँडरसनने (Jimmy Anderson) 4 विकेट घेतल्या.
पहिल्या डावात 85 धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या डावातही धक्के देण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने (Mitchell Starc) जॅक क्राऊली आणि डेव्हिड मलानला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 7 धावा अशी केली. त्यानंतर स्कॉट बोलँडने 11 व्या षटकात हासीब हमीद आणि जॅक लीच या दोघांनाही घरचा रस्ता दाखवत इंग्लंडची अवस्था 2 बाद 7 वरुन 4 बाद 22 धावा अशी केली. (Ashes Series AUS vs ENG)
दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने 4 बाद 31 धावा केल्या होत्या. जो रुट 12 तर बेन स्टोक्स 2 धावा करुन नाबाद होता. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि बोलँडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
इंग्लंडच्या दुसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात 4 बाद 31 धावा, अजूनही 51 धावांनी पिछाडीवर
इंग्लंडचे दुसऱ्या डावातही येरे माझ्या मागल्या, स्टार्क - बोलँडने इंग्लंडची अवस्था 4 बाद 22 धावा अशी केली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 267 धावात संपुष्टात, 82 धावांची आघाडी. अँडरसनने भेदक मारा करत टिपले 4 बळी
कमिन्स - स्टार्क जोडीची 34 धावांची भागीदारी, ऑस्ट्रेलिया 250 पार
कर्णधार पॅट कमिन्सचा कडवा प्रतिकार, ऑस्ट्रेलियाला मिळवून दिली अर्धशतकी आघाडी
अँडरसनने ऑस्ट्रेलियाला दिला मोठा धक्का, सेट झालेला मार्कस हॅरिसला 73 धावांवर केले बाद
रॉबिन्सनने ट्रव्हिस हेडला 27 धावांवर धाडले माघारी, कांगारुंचा निम्मा संघ माघारी
एकाकी झुंज देणाऱ्या सलामीवीर मार्कस हॅरिसचे(Marcus Harris) अर्धशतक पूर्ण
जेम्स अँडरनच्या जबदस्त इनस्विंगने उडाला स्टीव्ह स्मिथचा त्रिफळा
मार्क वूडने कांगारुंना दिला मोठा धक्का, फॉर्मध्ये असलेला मार्नस लॅम्बुशग्ने अवघ्या 1धावेवर माघारी
नाईट वॉचमन नॅथन लायन 10 धावांची भर घालून परतला
इंग्लंडकडून कांगारुंना पाठोपाठ धक्के, डेव्हिड वॉर्नर 38 धावा करुन माघारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.