अखेरच्या ओव्हरमध्ये स्टार्कनं इंग्लंडच्या आधाराच 'मूळ'च उखडले

Ashes Series Australia vs England 2nd Test  Day 4
Ashes Series Australia vs England 2nd Test Day 4Twitter
Updated on

Ashes Series Australia vs England 2nd Test : सामना जिंकण्याचं स्वप्न बाजूला ठेवून शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंडचा संघ मुश्किल परिस्थित अडकलाय. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात इंग्लंडचा कर्णधार जो रुटची विकेट पडल्यामुळे इंग्लंडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. चौथ्या दिवसाचा थांबण्यापूर्वी शेवटच्या षटकात मिशेल स्टार्कचा चेंडू जो रुटच्या बॅटची कड घेतली. एलेक्स कॅरीनं कोणतीही चूक न करता झेल टिपला आणि इंग्लंडला दिवसाअखेर मोठा धक्का बसला.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 468 धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकात हमीदच्या (Haseeb Hameed) रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. रिचर्डसन याने त्याला खातेही उघडू दिले नाही. डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि रॉरी बर्न्स (Rory Burns) जोडीनं धीरानं खेळत संघाला थोडा दिलासा दिला. पण मलानला बाद करत रिचर्डसनने (Jhye Richardson) पुन्हा एकदा इंग्लंडला अडचणीत आणले. मलानच्या रुपात त्याने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. मलान-बर्न्स जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची खेळी केली. यात मलानने 52 चेंडूंत 20 धावा केल्या. जो रुटसोबत 22 धावांची भागीदारी करुन सलामीवीर बर्न्सनेही तंबूचा रस्ता धरला. त्याने 95 चेंडूंचा सामना करताना 34 धावा केल्या.

Ashes Series Australia vs England 2nd Test  Day 4
Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच; व्हिडिओ व्हायरल

धावफलकावर 70 धावा असताना इंग्लंडचे तीन गडी तंबूत परतले होते. चौथ्या दिवसाअखेर जो रुट आणि बेन स्टोक्स नाबाद परततील अशी आशा इंग्लंडच्या चाहत्यांना होती. पण स्टार्कने इंग्लंड संघाची आणि त्यांच्या चाहत्यांची निराशा केली. चौथ्या दिवसातील अखेरच्या षटकात त्याने जो रुटला (Joe Root) ला बाद केले. त्याने 67 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्याच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला असून कसोटी सामना वाचवणे त्यांच्यासाठी आता मुश्किल झाले आहे.

Ashes Series Australia vs England 2nd Test  Day 4
Ashes : कागारुंनी पाहुण्या इंग्लंडसमोर ठेवलं डोंगराएवढं लक्ष्य

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स 3 धावांवर नाबाद खेळत होता. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजूनही 386 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी केवळ अखेरच्या दिवशी 6 विकेट काढायच्या आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियानेच जिंकला होता. दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी ते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.