Ashes Series Alex Carey Smooch Catch : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा अॅशेस कसोटी सामना हा हेडिंगले येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रलियासाठी मालिका खिशात घालण्याच्या दृष्टीने तर इंग्लंडसाठी मालिका वाचवण्याच्या दृष्टीने हा कसोटी सामना फार महत्वाचा आहे. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाकडून चांगलाच आक्रमकपणा दिसला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावात गुंडाळण्यात इंग्लंडला यश आले. तब्बल 4 वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मिचेल मार्शने 118 चेंडूत 118 धावांची आक्रमक शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने देखील इंग्लंडला दिवसाच्या शेवटच्या तीन धक्के दिले. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 3 बाद 68 धावा अशी झाली.
पॅट कमिन्सने इंग्लंडला दोन धक्के देत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने सलामीवीर बेन डकेट आणि हॅरी ब्रूकची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने पुन्हा एकदा विकेटच्या मागे कमाल केली. त्याने बेन डकेटचा झेल घेतला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कमिन्सने डकेटला एक अखुड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू डकेटच्या बॅटची कडा घेऊन विकेटकिपर एलेक्स कॅरीच्या दिशेने गेला. कॅरीनेही डाईव्ह मारत हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅरी हवेत असतानाच चेंडू ग्लोजमधून निसटत होता. कॅरीने झेल सुटू नये म्हणून चेंडू तोंडाने पकडून ठेवला.
कॅरीचा कॅच पाहून समालोचक आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने भन्नाट टिप्पणी केली. तो म्हणाला की, 'ओह हा नक्कीच स्मूच आहे. एलेक्स कॅरी हे तू काय करतोय.'
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंड अजून 195 धावांनी पिछाडीवर होता. जो रूट 19 तर जॉनी बेअरस्टो 1 धाव करून नाबाद होते. मार्शने 118 धावा ठोकल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 263 धावा केल्या. ग्रीन टॉप खेळपट्टीवर इंग्लंडच्या मार्क वूडने 34 धाात 5 विकेट्स टिपल्या.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 68 धावा केल्या. पॅट कमिन्सने 22 धावात 2 विकेट्स घेतल्या. तर अष्टपैलू मिचेल मार्शने झॅक क्राऊलीला 33 धावांवर बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.