Ashes : बटलर पहिल्या सत्रात हिरो शेवटच्या सत्रात झिरो (Video)

Jos Buttler Ashes Series
Jos Buttler Ashes Series esakal
Updated on

अ‍ॅडलेड : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेड (Adelaide) येथे खेळवण्यात येत आहे. गुलाबी चेंडूवरील दिवस रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाच्या या फटकेबाजीत पहिल्या दिवशी इंग्लंडचा विकेट किपर जोश बटलरच्या (Jos Buttler) एका कॅचचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यावेळी बटलरचे सोशल मीडियावर कौतुक झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी जोस बटलरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला.

ऑस्ट्रेलियाचा (Australia vs England) मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅम्बुशग्ने (Marnus Labuschagne) पहिल्या दिवशी 95 धावा करुन नाबाद होता. दिवसाचा खेळ संपल्यामुळे त्याच्या शतकाची प्रतिक्षा दुसऱ्या दिवसापर्यंत लांबली. अखेर त्याने दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. मात्र या 103 धावांच्या खेळीमध्ये त्याला दोन दा जीवनदान मिळाले. दोन्ही वेळा त्याचा झेल विकेट किपर जोस बटलरनेच सोडला. बटलरने मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) अप्रतिम कॅच पकडला होता. मात्र लॅम्बुशग्नेला दिलेल्या दोन जीवनदानांमुळे तो अप्रतिम झेल बाजूला पडला.

Jos Buttler Ashes Series
रोहितची जागा घेणार राहुल; विराट नेतृत्वाला खास मित्राची साथ

पहिल्याच दिवशी जोस बटलरने (Jos Buttler) लॅम्बुशग्नेच्या 21 धावांवर असताना कॅच सोडला होता. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात लॅम्बुशग्ने 95 धावांवर असताना पुन्हा एकदा बटलरने त्याला जीवनदान दिले. अँडरसनच्या गोलंदजीवर बटलरने एक साधा कॅच सोडला.

Jos Buttler Ashes Series
द्रविड सरांची 'किक' आणि विराटच्या चेहऱ्यावर उमटले हास्य Video

ऑस्ट्रेलियाकडून लॅम्बुशग्नेबरोबरच डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी देखील दमदार खेळी केली. मात्र या दोघांनाही आपली ही खेळी शतकात रुपांतरित करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर पहिल्या सामन्यात 94 धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यातही तो 95 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दुसऱ्या कसोटीला मुकला. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ याच्याकडे देण्यात आले. त्यानेही कॅप्टन्स इनिंग खेळत 93 धावांची खेळी केली. मात्र त्यालाही आपले शतक पूर्ण करता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.